मुख्य मजकुराकडे जा
, ३ नोव्हेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
ब्रेकिंग
‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’च्या आमरण उपोषणाचा पहिल्याच दिवशी ऐतिहासिक विजय! आरटीओ प्रशासन अखेर झुकले; कारवाईचे आदेश जारी झाल्यानंतर उपोषण तूर्त स्थगितपुणे-पिंपरी-चिंचवड ठरणार देशातील प्रमुख ‘मोबिलिटी हब’; शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोमुळे आयटीयन्सना मोठा दिलासा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुणे आरटीओ कार्यालयासमोर ‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’चे आमरण उपोषण सुरू; पहिल्याच दिवशी प्रशासनाचे धाबे दणाणले!हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासकीय पावले वेगाने; सहा डीपी रस्त्यांच्या भूसंपादनासह टीडीआर प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन: चैत्यभूमीवर १ डिसेंबरपासूनच सर्व सुविधा सज्ज ठेवा; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश
महाराष्ट्र

‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’च्या आमरण उपोषणाचा पहिल्याच दिवशी ऐतिहासिक विजय! आरटीओ प्रशासन अखेर झुकले; कारवाईचे आदेश जारी झाल्यानंतर उपोषण तूर्त स्थगित

निर्भीड वर्तमान फाउंडेशनचे पुणे आरटीओसमोरील आमरण उपोषण तूर्त स्थगित. एलपीजी वाहनांवर कारवाईचे निर्देश आणि चर्चेतील आश्वासनांनंतर निर्णय.

✍
2 मिनिटे वाचन

पुणे:- पुणे शहरातील लाखो नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ रोखण्यासाठी ‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’ने पुकारलेल्या आमरण उपोषणाला पहिल्याच दिवशी मोठा विजय मिळाला आहे.

शहरात सर्रास धावणाऱ्या अवैध, कालबाह्य आणि असुरक्षित एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर थेट कारवाई व्हावी, या मागणीसाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (RTO) सुरू केलेल्या आमरण उपोषणाने पहिल्याच दिवशी प्रशासनाचे धाबे दणाणले. फाउंडेशनने पुराव्यानिशी मांडलेल्या वस्तुस्थितीपुढे अखेर आरटीओ प्रशासनाला झुकावे लागले असून, पहिल्याच दिवशी कारवाईचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.

आमरण उपोषण

फाउंडेशनचे संस्थापक/संचालक श्रीकांत दारोळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या पुणे जिल्हा अध्यक्ष फिरोज शेख, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे तसेच पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्निल जगताप यांच्या आमरण उपोषणानंतर सायंकाळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी स्वतः चर्चा केली. पुणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे मान्य करत, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आदेश रस्ता सुरक्षा पथकांना देण्यात आले.

पुणे आरटीओ उपोषण स्थगित
पुणे आरटीओ उपोषण स्थगित

‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’च्या उपोषणाला मिळालेले मोठे यश व प्रशासनाचे निर्णय:

सर्व गॅस एजन्सींना कडक इशारा

नियम धाब्यावर बसवून सिलिंडर वाहतूक करणाऱ्या सर्व गॅस वितरक एजन्सींना प्रसिद्धीपत्रक (Press Note) काढून नियमांचे १०० टक्के पालन करण्याचे आदेश तात्काळ देण्यात येणार आहेत.

दिवाळीपर्यंत सर्व वाहनांवर धडक कारवाई

‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’ने दिलेल्या यादीनुसार सर्व संशयास्पद वाहनांची दिवाळीपर्यंत सखोल तपासणी करून त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

सुरक्षा पथकांना कारवाईचे थेट आदेश

कालबाह्य झालेली वाहने, फिटनेस व विमा नसलेली वाहने, विनापरवाना चालक, पूर्ण बंद बॉडी असलेली धोकादायक वाहने आणि अग्निशामक उपकरणांचा अभाव असलेल्या वाहनांवर थेट गुन्हे दाखल करून ती जप्त करण्याचे निर्देश रस्ता सुरक्षा पथकांना देण्यात आले आहेत.

प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी प्रत्यक्ष लेखी आदेशाची प्रत शिष्टमंडळाला सुपूर्द करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पहिल्याच दिवशी प्रशासनाने नमते घेऊन ठोस पावले उचलल्याने आणि कारवाईचे स्पष्ट आदेश दिल्याने ‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’ने आपले आमरण उपोषण तूर्त स्थगित केले आहे.

हा एका दिवसात मिळालेला मोठा विजय असला, तरी दिलेल्या मुदतीत ठोस कारवाई झाली नाही तर पुन्हा लढा उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , ,

संबंधित बातम्या

हिंजवडी वाहतूक कोंडी आणि सहा डीपी रस्त्यांच्या विकासाचे AI निर्मित प्रातिनिधिक चित्र; निर्भीड वर्तमान लोगो

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.