मुख्य मजकुराकडे जा
, ३० ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
ब्रेकिंग
डोंगर आणि जंगल उद्ध्वस्त करून मिळणारी वीज नको; झाडं तोडणाऱ्यांचे हात पँथर स्टाईलने मार्गी लावू: दीपक केदार यांचा इशारातृतीयपंथीयांना लोकसभा निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार; रिपाइंतर्फे उमेदवारी देणार: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणापिंपरी-चिंचवड RTO मध्ये दुचाकींसाठी नवीन ‘NW’ मालिका सुरू; आकर्षक व पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्याचे आवाहनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना दर्जेदार सुविधा पुरवा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देशपुणेकरांचे लक्ष असू द्या! चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर
महाराष्ट्र

तृतीयपंथीयांना लोकसभा निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार; रिपाइंतर्फे उमेदवारी देणार: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा

तृतीयपंथीयांना लोकसभा निवडणुकीत रिपाइंतर्फे उमेदवारी देण्याची रामदास आठवले यांची ग्वाही. मुंबईतील प्राइड इन पॉवर पुरस्कार सोहळ्यात राजकीय सहभागाचे आवाहन.

✍
2 मिनिटे वाचन

मुंबई:

मुंबईतील पुरस्कार सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना रामदास आठवले
मुंबईतील पुरस्कार सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना रामदास आठवले। छायाचित्र: प्राप्त सामग्री.

“तृतीयपंथीय हे भारताचे सन्माननीय नागरिक आहेत. त्यांना मतदानाच्या हक्कासोबतच विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढण्याचाही पूर्ण घटनात्मक अधिकार आहे. तृतीयपंथीयांनी मुख्य प्रवाहात येऊन राजकारणात सक्रिय व्हावे; माझ्या पक्षात आल्यास त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी नक्की उमेदवारी दिली जाईल,” अशी ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

रामदास आठवले

मुंबईतील ‘द ललित’ हॉटेलमध्ये आयोजित ‘ट्रान्सजेंडर अवॉर्ड’ वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आठवले यांच्या हस्ते ‘प्राइड इन पॉवर अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

प्राइड इन पॉवर सोहळ्यात रामदास आठवले यांच्या स्वागताचा क्षण
प्राइड इन पॉवर सोहळ्यात रामदास आठवले यांच्या स्वागताचा क्षण। छायाचित्र: प्राप्त सामग्री.

कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथी समुदायाच्या प्रतिनिधींनी राज्यसभेत एका जागेच्या आरक्षणाची मागणी आठवले यांच्याकडे लावून धरली. या मागणीला उत्तर देताना ते म्हणाले, “राज्यसभेत आरक्षणाची तरतूद नसली, तरी तृतीयपंथीयांना थेट जनतेतून लोकसभेची निवडणूक लढण्याचा अधिकार नक्कीच आहे. यापूर्वीही माझ्या पक्षाने गुजरातमध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीला निवडणूक रिंगणात उतरवून उमेदवारी दिली होती. भविष्यातही रिपब्लिकन पक्ष तृतीयपंथी उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.”

पुरस्कार आणि पुष्पगुच्छ प्रदान करतानाचा सोहळ्यातील क्षण
पुरस्कार आणि पुष्पगुच्छ प्रदान करतानाचा सोहळ्यातील क्षण। छायाचित्र: प्राप्त सामग्री.

पुढे बोलताना आठवले यांनी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथीय अशा सर्व घटकांच्या कल्याणासाठी अनेक प्रभावी योजना राबवल्या जात आहेत. तृतीयपंथीयांवर कुठेही अन्याय होऊ दिला जाणार नाही, त्यांना हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सदैव कटिबद्ध राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्राइड इन पॉवर सोहळ्यात व्यासपीठावर उपस्थित मान्यवर
प्राइड इन पॉवर सोहळ्यात व्यासपीठावर उपस्थित मान्यवर। छायाचित्र: प्राप्त सामग्री.

या सोहळ्यास ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार, न्यायमूर्ती आशा मेनन, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी, डॉ. सानवी जेठवानी, डॉ. अनमोल, आर्यन पाशान, रणजिता नायर, मोहिनी सुतार तसेच रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अमित तांबे यांच्यासह तृतीयपंथीय संघटनांचे अनेक प्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार प्रदान करताना रामदास आठवले आणि उपस्थित मान्यवर
पुरस्कार प्रदान करताना रामदास आठवले आणि उपस्थित मान्यवर। छायाचित्र: प्राप्त सामग्री.

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , ,

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.