मुख्य मजकुराकडे जा
, २४ ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
ब्रेकिंग
वाघोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: तब्बल १२.७५ लाख रुपयांचे ५१ गहाळ मोबाईल व टॅब मूळ मालकांना केले परतकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सदिच्छा भेट; विविध सामाजिक विषयांवर प्रदीर्घ चर्चाअंध व दुर्बल मतदारांसाठी मतदान सुविधा उपलब्ध करा; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देशअंध व दुर्बल मतदारांसाठी मतदान सुविधा उपलब्ध करा; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देशदीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रशासनाला निर्देश
राजकारण

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सदिच्छा भेट; विविध सामाजिक विषयांवर प्रदीर्घ चर्चा

रामदास आठवले यांनी जयपूर येथे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सदिच्छा भेट घेतली. सामाजिक विषय, आंबेडकरवादी ऐक्य आणि रिपब्लिकन पक्षाच्या एकत्रीकरणावर चर्चा.

✍
1 मिनिटे वाचन

जयपूर : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची जयपूर येथील लोकभवन (राजभवन) येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सामाजिक व राजकीय विषयांवर महत्त्वपूर्ण आणि प्रदीर्घ चर्चा झाली.

जयपूर येथे हरिभाऊ बागडे व रामदास आठवले यांच्या सदिच्छा भेटीतील पुष्पगुच्छ देतानाचे छायाचित्र

या बैठकीत राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि ना. रामदास आठवले यांच्यात आंबेडकरवादी चळवळीचे ऐक्य तसेच रिपब्लिकन पक्षाच्या विविध घटकांच्या एकत्रीकरणाबाबत आस्थेवाईकपणे विचारविनिमय झाला. दलित, वंचित आणि शोषित घटकांच्या कल्याणासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व प्रवाहांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. याशिवाय, देशात आणि राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर व सद्य राजकीय परिस्थितीवरही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

जयपूर येथील लोकभवनात हरिभाऊ बागडे आणि रामदास आठवले यांच्यात चर्चा

या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र गवई हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच पक्षाचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष राधामोहन सैनी, राष्ट्रीय सचिव प्रतिमा तोतला, नवरत्न गुशाईवाल, रमेश सैनी, अमर वीर सिंह यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

हरिभाऊ बागडे, रामदास आठवले आणि बैठकीला उपस्थित मान्यवर

भेटीनंतर उभय नेत्यांमध्ये अतिशय सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात संवाद पार पडल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , , ,

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.