पुणे प्रतिनिधी: पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने कोंढवा परिसरात मोठी कारवाई करत अवैद्य तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचा मोठा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व त्यांचे पथक शहरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार मंगेश गुंड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कोंढवा येथील कौसरबाग भागात, अर्बन बाईट्स हॉटेलच्या मागे असलेल्या मदिना डेली निड्स शॉपच्या पत्र्याच्या शेडमध्ये विविध कंपन्यांचा अवैद्य तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचा मोठा साठा साठवून ठेवण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे, १ जुलै २०२६ रोजी…
Author: निर्भीड वर्तमान टीम
पुणे, प्रतिनिधी:- पुण्यातील शिवणे, वारजे-कर्वेनगर परिसरात अनाधिकृत बांधकामांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. प्रशासन केवळ ‘कागदोपत्री’ कारवाईचा दिखावा करत असून, प्रत्यक्ष मैदानात मोठी अनाधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. या प्रकाराकडे पुणे महानगरपालिकेचा बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप ‘रिपब्लिकन संघर्ष सेने’चे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला आहे. रिपब्लिकन संघर्ष सेनेने महापालिकेच्या अभियंत्यांना थेट आव्हान दिले आहे. शशिकांत कांबळे म्हणाले, “पुढील सात दिवसांच्या आत महापालिकेचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी स्वतः शिवणे, वारजे-कर्वेनगर मध्ये येऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी. आम्ही कोणत्याही व्यक्तीविरोधात वैयक्तिक तक्रार करत नाही, तर हा संपूर्णतः सार्वजनिक हिताचा प्रश्न आहे. संघटनेच्या वतीने तुम्हाला…
पुणे प्रतिनिधी:- विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरच्या अवैध ऑनलाइन विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून १ लाख ४२ हजार ६९० रुपये किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला आहे. विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऑनलाइन बेकायदेशीरपणे ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ३० जून २०२६ रोजी एका बनावट ग्राहकामार्फत ऑनलाइन हुक्का फ्लेवरची ऑर्डर दिली. त्यानंतर सीसीडी चौक, कोनार्कनगर सोसायटीजवळ सापळा लावून पोर्टरद्वारे डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पार्सलमध्ये १८ हजार ३२० रुपये किमतीचे…
पुणे प्रतिनिधी:- विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका वृद्ध महिलेच्या घरातील ७ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे वृद्ध महिलेचे चोरीला गेलेले दागिने परत मिळवण्यास पोलिसांना यश आले आहे. दिनांक १६ जून २०२६ रोजी एका फिर्यादीने आपल्या वृद्ध आईचे घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याबाबत विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड यांच्यावर सोपवला होता. तपासादरम्यान पोलिसांनी फिर्यादीच्या घरी काम करणाऱ्या अनिता रामचंद्र सुतार (वय ४५ वर्षे, रा. मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) या महिलेला ताब्यात घेतले.…
पुणे प्रतिनिधी:- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत, राज्य सरकारच्या महसूल विभागाने ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील २० हेक्टर शासकीय जमीन पोलीस आयुक्तालयासाठी देण्यास औपचारिक मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आधुनिक आणि सुसज्ज मुख्यालयाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. पुणे जिल्ह्यातील ताथवडे येथील वळूमाता प्रक्षेत्राच्या ६७.१४ हेक्टर जमिनीपैकी २० हेक्टर जमीन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राउंड आणि इतर अनुषंगिक सुविधांसाठी पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही जमीन भोगवटामूल्यरहित आणि महसूलमुक्त दराने प्रदान करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड हे वेगाने वाढणारे औद्योगिक आणि नागरी केंद्र…
पुणे: पुणे शहरातील कात्रज-कोंढवा रोडवर भररस्त्यात नागरिकांना मारहाण करून मोबाईल फोनची जबरी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरट्याकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. दिनांक २४ मे २०२६ रोजी रात्री १०:३५ च्या सुमारास कात्रज-कोंढवा रोडवरील माऊलीनगर बस स्टॉपजवळ फिर्यादी दुध आणण्यासाठी पायदळ जात होते. यावेळी तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक…
पुणे प्रतिनिधी:- पुणे शहरात गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी कामगिरी केली आहे. नाकाबंदी दरम्यान एका संशयास्पद कारचा थरारक पाठलाग करत पोलिसांनी मोक्का आणि खुनाच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील तीन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे आणि एक कार असा एकूण ६ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाकाबंदी दरम्यान कारचा थरारक पाठलाग मिळालेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक नाकाबंदी सुरू होती. यादरम्यान वाघोलीकडून नगरच्या दिशेने येणारी एक पांढऱ्या रंगाची ‘ग्लांझा’ कार (ज्याला काळी फिल्म लावलेली…
पुणे प्रतिनिधी:- पुणे शहरातील शाळांच्या परिसरातील दुकानांमध्ये लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरणारे कृत्रिम रंगयुक्त खाद्यपदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या (Processed) जंक फूडची सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर विषयाची दखल घेत ‘रिपब्लिकन संघर्ष सेना’ या सामाजिक संघटनेने अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. रिपब्लिकन संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव, आयु. श्रीकांत दारोळे यांनी पाठवलेल्या निवेदनानुसार, FDA शाळांच्या आजूबाजूला मिळणाऱ्या रंगीत गोळ्या, चॉकलेट्स आणि चिप्स, कुरकुरे यांसारख्या जंक फूडमध्ये घातक रासायनिक रंग आणि प्रिझर्व्हेटिव्हजचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. हे पदार्थ दिसायला आकर्षक असल्याने लहान मुले त्याकडे आकर्षित होतात,…
पुणे | प्रतिनिधी:- पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाची राज्य सरकारने दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली. पावसाळी अधिवेशन २०२६ दरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. नेमके काय आहे प्रकरण? पुणे महानगरपालिकेत सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत काही भामट्यांनी बेरोजगार युवकांकडून लाखो रुपये उकळल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत व्यापक चौकशीचे आदेश दिले आहेत. गृह राज्यमंत्र्यांनी…
पुणे: पुणे महानगरपालिकेने शहरात अनधिकृत बांधकाम कारवाई तीव्र केली असून, पेठ शिवनेरी नगर परिसरात ४४०० चौ. फूट क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम निष्कासित केले आहे. ‘निर्भीड वर्तमान’च्या प्रतिनिधींना मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मा. महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार, अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उप-आयुक्त मा. श्री. सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष अभियान राबवण्यात आले. या कारवाईसाठी पुणे महानगरपालिकेचे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, एम.एस.एफ. जवान यांच्यासह जेसीबी, रॉकेटर, ब्रेकर आणि बिगारी सेवकांची मदत घेण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर हे बांधकाम त्वरित जमीनदोस्त करण्यात आले. पुणे महानगरपालिका आता शहरातील सर्व प्रभागांतील बेकायदेशीर बांधकामांवर बारीक लक्ष…

