मुख्य मजकुराकडे जा
, ३० ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
ब्रेकिंग
डोंगर आणि जंगल उद्ध्वस्त करून मिळणारी वीज नको; झाडं तोडणाऱ्यांचे हात पँथर स्टाईलने मार्गी लावू: दीपक केदार यांचा इशारातृतीयपंथीयांना लोकसभा निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार; रिपाइंतर्फे उमेदवारी देणार: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणापिंपरी-चिंचवड RTO मध्ये दुचाकींसाठी नवीन ‘NW’ मालिका सुरू; आकर्षक व पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्याचे आवाहनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना दर्जेदार सुविधा पुरवा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देशपुणेकरांचे लक्ष असू द्या! चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर
महाराष्ट्र

डोंगर आणि जंगल उद्ध्वस्त करून मिळणारी वीज नको; झाडं तोडणाऱ्यांचे हात पँथर स्टाईलने मार्गी लावू: दीपक केदार यांचा इशारा

पालिपोटल येथील वृक्षतोडीवर दीपक केदार यांचा आक्षेप; आदिवासी, जंगल व ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाची मागणी. अलिबाग वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चाचा इशारा.

✍
3 मिनिटे वाचन

अलिबाग (रायगड):- “गुजरातच्या दबावाखाली काम करणारे हे सरकार भांडवलदारांची आणि अदानीची हुजरेगिरी करत आहे. या विकासकामांच्या नावाखाली आदिवासी उद्ध्वस्त होत असून येथील डोंगरांमध्ये असलेल्या प्राचीन बुद्ध लेण्या आणि सम्राट अशोकाच्या पाऊलखुणा धोक्यात आल्या आहेत. आता या लढ्यात पँथरची एन्ट्री झाली असून, यापुढे झाडं तोडणारे हात पँथर स्टाईलने मार्गी लावले जातील; कोणालाही सोडले जाणार नाही,” असा थेट इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला.

दीपक केदार

रायगड जिल्ह्यातील अलिबाग वनपरिक्षेत्रांतर्गत पालिपोटल गावात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर दीपक केदार यांनी पदाधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

दीपक केदार माध्यमांशी बोलताना आणि उपस्थित कार्यकर्ते

पुढील पिढीला निसर्ग केवळ चित्रातच दाखवावा लागेल

घटनास्थळाची स्थिती पाहून संताप व्यक्त करत केदार म्हणाले, “पालिपोटल गावात झालेली अमानुष झाडतोड पाहून डोळ्यात पाणी येते. झाडे असतील तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तर पाणी मिळेल, ही साधी व्याख्याही या सरकारला कळत नाही. सर्व काही खाऊन झाल्यावर आता हे सरकार आणि उद्योगपती डोंगर खायला निघाले आहेत. असाच निसर्गाचा विध्वंस सुरू राहिला, तर पुढच्या पिढीला नदी, धबधबे, डोंगर, पक्षी आणि प्राणी प्रत्यक्षात न दिसता केवळ पेंटिंगमध्ये काढून दाखवावे लागतील. सोन्यापेक्षा पाण्याला खरी किंमत आहे हे भांडवलदारांनी ओळखले आहे, म्हणूनच जल-जंगल-जमिनीवर ताबा मिळवण्याचा घाट घातला जात आहे.”

पालिपोटल येथे भूमिका मांडताना दीपक केदार
पालिपोटल येथे भूमिका मांडताना दीपक केदार — प्राप्त छायाचित्र;

अदानी आणि ऊर्जा प्रकल्पांवर कडाडून टीका

अदानी समूहावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, “अदानीने कायम आदिवासींची जमीन गिळंकृत करण्याचे काम केले आहे. गुजरातमध्ये आदिवासी मच्छीमारांची किनारपट्टी अशाच प्रकारे घशात घालण्यात आली. टोरंट पॉवरकडून वीज निर्मिती होत असताना पवनचक्की आणि सौर ऊर्जा प्रकल्पांच्या नावाखाली पुन्हा निसर्गाचा बळी कशासाठी दिला जात आहे? जंगल आणि स्थानिक आदिवासींना उद्ध्वस्त करून मिळणारी वीज आम्हास नको आहे.” निसर्ग वाचला तरच मानवी जात टिकेल, असे आवाहनही त्यांनी सर्वसामान्य जनतेला केले.

वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा काढणार

वनपरिक्षेत्र अलिबाग विभागाने ही वृक्षतोड नेमके कोणते टेंडर काढून केली, असा सवाल उपस्थित करत केदार म्हणाले की, “याचे उत्तर वनविभागाला द्यावेच लागेल. लवकरच आम्ही अलिबाग वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा नेणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक पाऊलखुणा आणि निसर्ग उद्ध्वस्त होऊ देणार नाही. या संघर्षात पँथर सेना संपूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरेल.”

तोडलेल्या वृक्षांजवळ पाहणीदरम्यान उपस्थित पदाधिकारी
तोडलेल्या वृक्षांजवळ पाहणीदरम्यान उपस्थित पदाधिकारी — प्राप्त छायाचित्र;

या दौऱ्यादरम्यान ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस जितेशभाई जगताप, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, महाराष्ट्र समन्वयक माधव भालेराव, रायगड जिल्हाध्यक्ष संदेश भालेराव, कोकण कामगार अध्यक्ष मंगेश सावंत, किरण शिंदे, विलास कांबळे, मारुती जाधव, आवेश भालेराव, रमाकांत सोनवणे, वैभव खंडागळे, सचिन कांबळे आणि राजू साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#दीपककेदार #वृक्षतोड #अलिबाग

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , , , ,

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.