पिंपरी-चिंचवड RTO मध्ये दुचाकींसाठी नवीन ‘NW’ मालिका सुरू; आकर्षक व पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्याचे आवाहन
पसंतीच्या क्रमांकांसाठी ३० ऑक्टोबरला तिप्पट शुल्कासह, तर २ नोव्हेंबरला उर्वरित क्रमांकांसाठी अर्ज स्वीकारले जाणार; लिलाव व कागदपत्रांचा तपशील जाहीर.

पिंपरी-चिंचवड:- पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) दुचाकी वाहनांसाठी लवकरच ‘NW’ ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. आपल्या दुचाकीसाठी ‘व्हीआयपी’ किंवा आवडीचा पसंतीचा क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या वाहनचालकांसाठी आरटीओ प्रशासनाने नोंदणी प्रक्रिया जाहीर केली असून, इच्छुकांना ३० ऑक्टोबरपासून विहित नमुन्यात अर्ज करता येणार आहेत.

३० ऑक्टोबरला तिप्पट शुल्कासह अर्जाची संधी
नवीन ‘NW’ मालिकेतील आकर्षक व पसंतीचे क्रमांक शासकीय शुल्काच्या तीनपट शुल्क भरून आगाऊ आरक्षित करण्यासाठी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २:३० या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
यानंतर, या मालिकेतील उर्वरित आकर्षक व पसंतीच्या क्रमांकांसाठी २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २:३० या वेळेत नियमित अर्ज स्वीकारण्यात येतील.

लिलाव व बोली प्रक्रियेचे वेळापत्रक:
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे:
चारचाकी वाहनांच्या अर्जदारांची यादी २ नोव्हेंबर रोजी, तर दुचाकी वाहनांच्या अर्जदारांची यादी ३ नोव्हेंबर रोजी RTO कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल.
अधिक रकमेची बोली लावण्यासाठी संबंधितांनी अनुक्रमे २ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २:३० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात डिमांड ड्राफ्ट (DD) जमा करावा.
त्याच दिवशी दुपारी ३:३० वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बोली प्रक्रिया पार पडेल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे व नियम:
नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे अनिवार्य आहे:
‘हे’ नियम लक्षात ठेवा:
इच्छुक वाहनचालकांनी विहित वेळेत आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: NW मालिका, RTO, दुचाकी, पसंतीचे क्रमांक, पिंपरी-चिंचवड, वाहन नोंदणी





प्रतिक्रिया व्यक्त करा