मुख्य मजकुराकडे जा
, २८ ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
ब्रेकिंग
पिंपरी-चिंचवड RTO मध्ये दुचाकींसाठी नवीन ‘NW’ मालिका सुरू; आकर्षक व पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्याचे आवाहनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना दर्जेदार सुविधा पुरवा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देशपुणेकरांचे लक्ष असू द्या! चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीरहिंगणीगाडा येथील ‘महादेव मळा’ पाझर तलावाला स्टोन क्रशरचा धोका; खोदकाम तात्काळ थांबवण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणीभीमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीत बेंगळुरूमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात; ४०० कुटुंबांकडून आंबेडकरी विचारांची परंपरा कायम
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना दर्जेदार सुविधा पुरवा; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

चैत्यभूमीवरील पूर्वतयारीचा मंत्रालयात आढावा; सुरक्षा, वाहतूक, पाणी, आरोग्य आणि निवारा सुविधांचे समन्वयाने नियोजन करण्याच्या सूचना.

✍
2 मिनिटे वाचन

मुंबई:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) मुंबईतील चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी अभिवादनासाठी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनुयायांना आवश्यक त्या सर्व नागरी व आरोग्य सुविधा तत्परतेने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काटेकोर नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

७० वा महापरिनिर्वाण दिन

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह विभाग, सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे गर्दीवर नजर; कडक पोलीस बंदोबस्त

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरासह मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आणि महत्त्वाच्या स्मारक स्थळांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, अशा सूचना बनसोडे यांनी दिल्या. गर्दीचे नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला. त्यानुसार संपूर्ण परिसरात ड्रोन आणि सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणेद्वारे २४ तास नजर ठेवली जाईल. अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश त्यांनी दिले.

७० वा महापरिनिर्वाण दिन

वाहतूक बदलांची माहिती नागरिकांना आधीच द्या

६ डिसेंबरच्या काळात दादर आणि लगतच्या परिसरातील वाहतुकीत मोठे बदल केले जातात. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीतील बदलांची माहिती वृत्तपत्रे, समाजमाध्यमे आणि डिजिटल फलकांच्या माध्यमातून आगाऊ जनतेपर्यंत पोहोचवावी. तसेच बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी सुयोग्य नियोजन करावे, असेही त्यांनी नमूद केले.

मूलभूत नागरी सुविधांवर भर

लाखो अनुयायांच्या सोयीसाठी पिण्याचे शुद्ध पाणी, फिरती शौचालये, अखंड वीजपुरवठा, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि निवाऱ्याची पुरेशी सोय प्रशासनाकडून करण्यात यावी. कोणत्याही अनुयायाला त्रास होणार नाही याची दक्षता स्थानिक पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने घ्यावी, असे निर्देश देत संबंधित विभागांनी वेळेत सर्व कामे पूर्ण करावीत, असे आवाहन विधानसभा उपाध्यक्षांनी केले.

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , ,

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.