मुख्य मजकुराकडे जा
, ५ नोव्हेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
ब्रेकिंग
मुठा व मोसे खोऱ्यातील ३०० आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट, फराळ वाटप; टेमघर येथे विविध विकासकामांचे थाटात उद्घाटन‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’च्या आमरण उपोषणाचा पहिल्याच दिवशी ऐतिहासिक विजय! आरटीओ प्रशासन अखेर झुकले; कारवाईचे आदेश जारी झाल्यानंतर उपोषण तूर्त स्थगितपुणे-पिंपरी-चिंचवड ठरणार देशातील प्रमुख ‘मोबिलिटी हब’; शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोमुळे आयटीयन्सना मोठा दिलासा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुणे आरटीओ कार्यालयासमोर ‘निर्भीड वर्तमान फाउंडेशन’चे आमरण उपोषण सुरू; पहिल्याच दिवशी प्रशासनाचे धाबे दणाणले!हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासकीय पावले वेगाने; सहा डीपी रस्त्यांच्या भूसंपादनासह टीडीआर प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
राजकारण

शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी घेतली रिपाई अध्यक्ष दिपक (भाऊ) निकाळजे यांची भेट; आरोग्याची चौकशी करत दिल्या शुभेच्छा

खासदार अनिल देसाई यांनी रिपाई (आंबेडकर)चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांची छेडानगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

✍
2 मिनिटे वाचन

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनिल देसाई यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांची छेडानगर येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांती घेत असलेल्या निकाळजे यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

प्रकृतीची विचारपूस करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा

भेटीदरम्यान खासदार अनिल देसाई यांनी दिपक भाऊ निकाळजे यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेतले. निकाळजे यांची प्रकृती लवकर सुधारावी आणि ते पुन्हा सामाजिक व सार्वजनिक कार्यात सक्रिय व्हावेत, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या. ही भेट सदिच्छा आणि आरोग्यविषयक विचारपूस करण्याच्या स्वरूपाची होती.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब पवार, शिवसेनेचे विभागप्रमुख प्रमोद शिंदे, दिनेश बोभाटे, रुपेश मढवी, रिपाई उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश कटरनवरे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खरात, चेंबूर परिसरातील मनीष गुप्ता, पंचम गोड आणि विजय सुरडकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही दिपक भाऊ निकाळजे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , , ,

संबंधित बातम्या

1 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.