मुख्य मजकुराकडे जा
, २० सप्टेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
क्राईम

सायबर फसवणूक टाळण्यासाठी ‘हे’ ३ नियम पाळा; लोहगाव पोलीस निरीक्षक राकेश कदम यांचे आवाहन

पुणे (निर्भीड वर्तमान): इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. ऑनलाईन व्यवहार करताना किंवा सोशल मीडिया वापरताना झालेला क्षणभराचा निष्काळजीपणा मोठ्या आर्थिक फसवणुकीला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने इंटरनेट वापरताना सतर्क राहणे आवश्यक असल्याचे लोहगाव पोलीस ठाण्याच…

2 मिनिटे वाचन

पुणे (निर्भीड वर्तमान): इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. ऑनलाईन व्यवहार करताना किंवा सोशल मीडिया वापरताना झालेला क्षणभराचा निष्काळजीपणा मोठ्या आर्थिक फसवणुकीला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने इंटरनेट वापरताना सतर्क राहणे आवश्यक असल्याचे लोहगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश कदम यांनी सांगितले.

पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत धानोरी येथील अष्टविनायक मित्र मंडळात आयोजित सायबर जनजागृती कार्यक्रमात ते नागरिकांशी संवाद साधत होते.

सायबर सुरक्षेचे ३ महत्त्वाचे नियम

पोलीस निरीक्षक राकेश कदम यांनी सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी दैनंदिन आयुष्यात तीन महत्त्वाचे नियम पाळावेत, असे आवाहन केले.

१) थिंक बिफोर क्लिक (Think Before Click) अनोळखी क्रमांकावरून आलेली कोणतीही लिंक, फाईल किंवा APK डाउनलोड करू नये. वाहतूक दंड, KYC, बँक अपडेट, पार्सल किंवा इतर कारणांनी आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून माहितीची खात्री करावी.

२) व्हेरिफाय बिफोर ट्रस्ट (Verify Before Trust) गुंतवणुकीवर दुप्पट किंवा अतिशय जास्त परतावा, कमी किमतीत महागड्या वस्तू, लॉटरी, बक्षीस किंवा तत्काळ नफा मिळण्याचे आमिष दाखविणाऱ्या संदेशांवर लगेच विश्वास ठेवू नये. कोणतीही आर्थिक माहिती किंवा ऑफर स्वीकारण्यापूर्वी संबंधित संस्था अथवा अधिकृत माध्यमातून खात्री करावी.

३) अलर्ट ऑन ऑनलाईन (Alert On Online) अनावश्यक संकेतस्थळे, संशयास्पद ॲप्स आणि बनावट सोशल मीडिया खात्यांपासून दूर राहावे. OTP, बँक खाते तपशील, पासवर्ड, डेबिट-क्रेडिट कार्ड माहिती किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये. पालकांनी मुलांच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवणेही गरजेचे आहे.

सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर त्वरित तक्रार करा

सायबर गुन्हा किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास भीती किंवा बदनामीपोटी घटना लपवू नये. त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा तसेच राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवावी. फसवणुकीनंतर शक्य तितक्या लवकर तक्रार केल्यास आर्थिक व्यवहार थांबविण्यास आणि रक्कम परत मिळविण्याच्या प्रक्रियेला मदत होऊ शकते.

या जनजागृती कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक दिनेश राऊत, पोलीस शिपाई बाजीराव वीर, अष्टविनायक मंडळाचे अध्यक्ष शुभम रासकर, उपाध्यक्ष सिद्धांत जवारे आणि कार्याध्यक्ष रोहन चटीयार यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , ,

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.