मुख्य मजकुराकडे जा
शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

क्राईम

सोशल मीडियावर मैत्री अन् घरात चोरी: पुण्यातून फरार झालेल्या आरोपीला वडोदऱ्यातून बेड्या; १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

2 मिनिटे वाचन

पुणे (कोंढवा) :- सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेशी मैत्री करून, विश्वासाने घरी आलेल्या मित्रानेच घरातील रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा खुर्द येथे उघडकीस आला होता. या प्रकरणाचा वेगाने तपास करत कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आरोपीला गुजरातच्या वडोदरा येथून शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला तब्बल १४ लाख ३९ हजार ४९६ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

यश कैलास भुलचंदानी (वय २४, रा. मोहाडी, ता. बीजापूर, जि. म्हैसाणा, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

२५ जून २०२६ रोजी फिर्यादी महिलेचा सोशल मीडियावरील मित्र ‘यश’ हा त्यांच्या कोंढवा खुर्द येथील घरी आला होता. दरम्यान, फिर्यादी महिला सोसायटमध्येच राहणाऱ्या मावशीच्या घरी जेवणाचा डबा देण्यासाठी बाहेर गेल्या. हीच संधी साधून यश याने बेडरूममधील कपाटात ठेवलेली २४ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण १४,६३,४९६ रुपयांचा ऐवज चोरला आणि तो पसार झाला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ४९४/२०२६) दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचा शोध

गुन्हा दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार केशव हिरवे यांनी तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) केले. त्याद्वारे आरोपी वडोदरा (गुजरात) येथे असल्याची पक्की माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, राहुल रासगे आणि केशव हिरवे यांच्या पथकाने गुजरात गाठले. गोरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, सुभानपुरा, आयपीसीएल रोड येथे सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

१६ तोळे सोने अन् रोख रक्कम हस्तगत

आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण १४,३९,४९६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही बातमी कशी वाटली?

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नका.