मुख्य मजकुराकडे जा
, २९ सप्टेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
क्राईम

FDA शाळा परिसरातील घातक ‘जंक फूड’ विक्रीवर बंदी घाला; रिपब्लिकन संघर्ष सेनेची अन्न व औषध प्रशासनाकडे मागणी

✍
2 मिनिटे वाचन

पुणे प्रतिनिधी:- पुणे शहरातील शाळांच्या परिसरातील दुकानांमध्ये लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरणारे कृत्रिम रंगयुक्त खाद्यपदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या (Processed) जंक फूडची सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर विषयाची दखल घेत ‘रिपब्लिकन संघर्ष सेना‘ या सामाजिक संघटनेने अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रिपब्लिकन संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव, आयु. श्रीकांत दारोळे यांनी पाठवलेल्या निवेदनानुसार, FDA शाळांच्या आजूबाजूला मिळणाऱ्या रंगीत गोळ्या, चॉकलेट्स आणि चिप्स, कुरकुरे यांसारख्या जंक फूडमध्ये घातक रासायनिक रंग आणि प्रिझर्व्हेटिव्हजचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. हे पदार्थ दिसायला आकर्षक असल्याने लहान मुले त्याकडे आकर्षित होतात, परंतु यामुळे मुलांची पचनसंस्था कमकुवत होत आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा पदार्थांच्या नियमित सेवनामुळे भविष्यात कर्करोगासारखे (Cancer) गंभीर आजार जडण्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे.

शाळा परिसर हा मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. FDA मात्र, सध्या सुरू असलेल्या या विक्रीमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या संदर्भात रिपब्लिकन संघर्ष सेनेने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

* शाळांच्या १०० मीटर परिसरातील दुकानांची FDA अन्न व औषध प्रशासनाकडून अचानक तपासणी (Surprise Inspection) करण्यात यावी.
* संबंधित हानिकारक खाद्यपदार्थांचे नमुने त्वरित तपासले जावेत.
* निकृष्ट दर्जाचे आणि घातक घटक असलेले पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांवर अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार (FSSAI) कडक कायदेशीर कारवाई करून, अशा विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी.

शाळा परिसरातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने FDA या प्रकरणात तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

ही बातमी कशी वाटली?

टॅग:

संबंधित बातम्या

1 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.