मुख्य मजकुराकडे जा
, २८ सप्टेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
क्राईम

PunePolice; पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ६ दुचाकींसह ४.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

✍
2 मिनिटे वाचन

पुणे: पुणे शहर PunePolice; गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ चोरीच्या मोटारसायकल आणि ४ मोबाईल असा एकूण ४,९५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक २४ जून २०२६ रोजी युनिट ७ कडील पथक वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार नितीन धाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरी करणारे रेकॉर्डवरील दोन आरोपी बायफ रोड, वाघोली येथे उभे आहेत.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितरित्या उभ्या असलेल्या दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची नावे अरसलान मुस्ताक तांबोळी (वय १८) आणि सिद्धांत दिलीप वाघमारे (वय १८) अशी आहेत.

टोळीकडून ६ गुन्हे उघडकीस

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, या आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यांनी आपला आणखी एक साथीदार अरमान रियाज तांबोळी (वय १८) आणि एका विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने या चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून जप्त केलेल्या दुचाकींच्या आधारे पोलिसांनी PunePolice;  खालील पोलीस ठाण्यांमधील ६ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत:

  • लोहगाव पोलीस स्टेशन

  • लोणी काळभोर पोलीस स्टेशन (दोन गुन्हे)

  • शिक्रापूर पोलीस स्टेशन

  • विश्रांतवाडी पोलीस स्टेशन

  • भोसरी पोलीस स्टेशन ही धडाकेबाज कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कामगिरीत PunePolice; वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि गुन्हे शाखेच्या युनिट ७ मधील पोलीस अंमलदार सारंग दळे, प्रशांत कापुरे, विनायक साळवे, निलेश साळवे, निर्णय लांडे, गिरीष नाणेकर, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, नितीन धाडगे, किरण पलांडे, समाधान पाटील, नेहा तापकीर, सोनाली नरवडे व प्रतिक्षा पानसरे यांचा समावेश होता.

ही बातमी कशी वाटली?

टॅग:

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.