पुणे: पुणे शहर PunePolice; गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ चोरीच्या मोटारसायकल आणि ४ मोबाईल असा एकूण ४,९५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक २४ जून २०२६ रोजी युनिट ७ कडील पथक वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार नितीन धाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरी करणारे रेकॉर्डवरील दोन आरोपी बायफ रोड, वाघोली येथे उभे आहेत.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितरित्या उभ्या असलेल्या दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची नावे अरसलान मुस्ताक तांबोळी (वय १८) आणि सिद्धांत दिलीप वाघमारे (वय…
Author: Ashwini Darole
मुंबई: धुळे जिल्ह्यातील देवपूर येथे प्रस्तावित असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पातील सर्व तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तात्काळ दूर करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. मंत्रालय स्तरावर आयोजित एका विशेष आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. धुळे जिल्हातील देवपूर येथील ‘हरिजन सेवक संघ’ संचलित राजेंद्र छात्रालय वसतिगृह परिसरात हे भव्य स्मारक आणि ग्रंथालय उभारण्यात येत आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे या इमारतीचे उर्वरित काम रखडले होते. 🏗️ स्मारक प्रकल्पाचे काम का रखडले होते? सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी…

