मुख्य मजकुराकडे जा
, १४ सप्टेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
महाराष्ट्र

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महिला व मुलगा बेपत्ता; शोध घेण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

2 मिनिटे वाचन

पुणे (प्रतिनिधी) : पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक २५ ते २८ वयोगटातील महिला आपल्या लहान मुलासह अचानक निघून गेल्याची घटना समोर आली असून, त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद छोटेलाल कुमार (वय ३२, रा. ढोबरवाडी, सोपान बाग, स्टीफन रावत यांच्याकडे भाड्याने, पुणे; मूळ गाव: चौथी, जगदीपूर, पोस्ट मठमोहम्मदपूर, मऊ, उत्तर प्रदेश) यांनी आपल्या पत्नीबाबत मिसिंग तक्रार दाखल केली आहे. त्यांची पत्नी सौ. साधना गोविंद कुमार (वय २८) आणि लहान मुलगा अनिकेत हे दोघेजण दिनांक २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:०० ते ७:३० वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरातून सांगून न जाता बाहेर पडले, ते अद्याप परतले नाहीत.

बेपत्ता महिलेचे वर्णनात्मक तपशील:

  • नाव: सौ. साधना गोविंद कुमार

  • वय: २८ वर्षे

  • बांधा: मध्यम

  • रंग: गोरा

  • उंची: ४ फूट ६ इंच

  • चेहरा: गोल

  • नाक: सरळ

  • डोळे: काळे-पांढरे

  • केस: काळे व लांब

  • भाषा: हिंदी आणि भोजपुरी बोलणाऱ्या

  • परिधान केलेले कपडे: मरून रंगाचा ड्रेस आणि त्यावर लाल रंगाची ओढणी.

  • इतर तपशील: सोबत अंदाजे १००० रुपये असून जवळ मोबाईल फोन नाही.

संपर्क व आवाहन: सदर बेपत्ता महिला (सौ. साधना गोविंद कुमार) किंवा त्यांच्या मुलाबाबत (अनिकेत) कोणतीही माहिती अथवा सुगावा लागल्या नागरिकांनी त्वरित वानवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी कशी वाटली?

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.