मुख्य मजकुराकडे जा
, ३ ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
क्राईम

कोंढव्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: अवैद्य हुक्का फ्लेवरचा साठा जप्त

✍
2 मिनिटे वाचन

पुणे प्रतिनिधी: पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने कोंढवा परिसरात मोठी कारवाई करत अवैद्य तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचा मोठा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व त्यांचे पथक शहरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार मंगेश गुंड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कोंढवा येथील कौसरबाग भागात, अर्बन बाईट्स हॉटेलच्या मागे असलेल्या मदिना डेली निड्स शॉपच्या पत्र्याच्या शेडमध्ये विविध कंपन्यांचा अवैद्य तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचा मोठा साठा साठवून ठेवण्यात आला आहे.

या माहितीच्या आधारे, १ जुलै २०२६ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

 * लतीफ लाल शेख (वय ६२ वर्षे, रा. ८२४, भवानी पेठ, पुणे)

 * नवाज अरमानखान पठाण (वय २६ वर्षे, रा. भाग्यदेयनगर, इस्लाम बेकरी शेजारी, कोंढवा, पुणे)

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २,८५,४१० रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा अवैद्य तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरचा साठा जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-१ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उप-निरीक्षक योगेश कोतकर आणि पोलीस अंमलदार आशा भिंगारे, संजय राजे, अमोल सरडे, निलेश जाधव, विजय कांबळे, अतुल क्षीरसागर, सचिन लोहार, निशिकांत सावंत, तुषार साळुंके, जानव्ही सुर्यवंशी व मंगेश गुंड यांच्या पथकाने केली आहे.

ही बातमी कशी वाटली?

टॅग:

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.