मुख्य मजकुराकडे जा
, १३ सप्टेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
महाराष्ट्र

सणासुदीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! दोन दिवसांत तब्बल ४ कोटी ४५ लाखांचा अन्नसाठा जप्त

सणासुदीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! दोन दिवसांत तब्बल ४ कोटी ४५ लाखांचा अन्नसाठा जप्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात धडक मोहीम; पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि बुलढाण्यात धाडी! विशेष बातमी प्रतिनिधी (निर्भिड वर्तमान) मुंबई / पुणे: आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्…

2 मिनिटे वाचन

आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात धडक मोहीम; पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि बुलढाण्यात धाडी!

विशेष बातमी प्रतिनिधी (निर्भिड वर्तमान)

मुंबई / पुणे:

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संपूर्ण राज्यात धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसांत राज्यभरात विविध ठिकाणी कारवाई करत ४ कोटी ४५ लाख रुपये किमतीचा भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पुण्यात बुधवार पेठेत मोठी कारवाई; ४३ लाखांचे पनीर, खवा जप्त

पुण्यातील बुधवार पेठ परिसरात भेसळयुक्त पनीर, खवा आणि दही विक्रीसाठी आणले जात असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार ११ सप्टेंबर रोजी वाहनांवर पाळत ठेवून केलेल्या कारवाईत:

MH-12 QW-7011 या वाहनातून १७,१५,३६४ रुपये किमतीचे पनीर व दही जप्त करण्यात आले.

MH-12 WX-7011 या वाहनातून १४,५५,२९० रुपये किमतीचे पनीर जप्त केले गेले.

मे. के. बी. अगरवाल या पेढीची पाहणी केली असता, तेथून ११,५६,७५० रुपये किमतीचा ४६७ किलो खवा जप्त करून हडपसर येथे नष्ट करण्यात आला.

एकूण जप्ती: पुण्यातून तब्बल ४३ लाख २७ हजार ७०४ रुपयांचा (१८,०७०.५ किलो) साठा जप्त करून ६९ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

अहिल्यानगर, नाशिक आणि बुलढाण्यातही धाडी

अहिल्यानगर (एम.आय.डी.सी.): १० सप्टेंबर रोजी ‘मे. अरिहंत कोल्ड स्टोरेज’वर धाड टाकून ‘Pasteuried cooking Butter (unsalted)’ या कमी दर्जाच्या आणि लेबल उल्लंघनाखालील ३,९५,६२,३२० रुपये किमतीचा साठा (७५,३५६.८ कि.) जप्त करण्यात आला.

नाशिक (द्वारका परिसर): ११ सप्टेंबरच्या पहाटे गुजरातवरून खाजगी बसमधून अवैधपणे आणली जाणारी ५,५८,२६७ रुपये किमतीची ‘स्पेशल स्वीट बर्फी’ (२१५५ किग्रॅ) जप्त करण्यात आली.

बुलढाणा (नांदुरा): १२ सप्टेंबर रोजी ‘मे. मराठवाडा-विदर्भ दूध उत्पादक संस्था’ येथे नोंदणी प्रमाणपत्र व स्वच्छता निकष नसल्यामुळे जप्त केलेले दुधाचे नमुने नष्ट करण्यात आले.

नागरिकांसाठी तक्रार केंद्र आणि इशारा

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रारीसाठी एफडीएने टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ आणि https://complaints.mahafda.in हे पोर्टल उपलब्ध केले आहे.

“महाराष्ट्रात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन अत्यंत कठोर आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.”

— तुकाराम मुंढे (आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य)

ही बातमी कशी वाटली?

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.