मुख्य मजकुराकडे जा
, ४ ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
ताज्या बातम्या

लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई: मोक्का आणि खुनाच्या गुन्ह्यातील ३ अट्टल गुन्हेगार जेरबंद; पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त

✍
3 मिनिटे वाचन

पुणे प्रतिनिधी:- पुणे शहरात गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी कामगिरी केली आहे. नाकाबंदी दरम्यान एका संशयास्पद कारचा थरारक पाठलाग करत पोलिसांनी मोक्का आणि खुनाच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील तीन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे आणि एक कार असा एकूण ६ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नाकाबंदी दरम्यान कारचा थरारक पाठलाग

मिळालेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक नाकाबंदी सुरू होती. यादरम्यान वाघोलीकडून नगरच्या दिशेने येणारी एक पांढऱ्या रंगाची ‘ग्लांझा’ कार (ज्याला काळी फिल्म लावलेली होती) पोलिसांना दिसली.

तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, सुधीर शिवले आणि मल्हारी सपुरे यांनी कारला बाजूला घेण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहून चालकाने कारचा वेग वाढवून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून नाकाबंदीवरील इतर अधिकारी आणि अंमलदारांच्या मदतीने पोलिसांनी या कारला वेढा घालून थांबवले.

अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी कारची झडती घेतली असता, त्यामध्ये पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील अतिशय गंभीर गुन्हे असलेले खालील तीन आरोपी मिळून आले: १) रोहन ऋषिकेश गायकवाड (वय २२ वर्षे, रा. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे)२) अभिषेक भानुदास लंघे (वय २५ वर्षे, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे)३) विशाल उद्धव झोडगे (वय २२ वर्षे, रा. कासारी, ता. शिरूर, जि. पुणे) हे तिन्ही आरोपी मोक्का (MCOCA) आणि खुनाच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

पिस्टल आणि मुद्देमाल जप्त

आरोपींची आणि कारची कसून झडती घेतली असता पोलिसांना खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले:

  • देशी बनावटीचे पिस्टल: १ (किंमत अंदाजे ३०,००० रुपये)

  • जिवंत काडतुसे: ३ (किंमत अंदाजे ६,००० रुपये)

  • ग्लांझा कार: १ (किंमत अंदाजे ६,०००,००० रुपये)

  • एकूण जप्त मुद्देमाल: ६,३६,००० रुपये

गुन्हा दाखल व पुढील तपास

याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गु.र.नं. २७०/२०२६ नुसार आर्म अ‍ॅक्ट कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन कागणे करत आहेत.

यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कामगिरी:

सदरची यशस्वी कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, परिमंडळ ७ चे पोलीस उप-आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, लोणीकंद विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती नुतन पवार, लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती स्वाती खेडकर यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे सपोनि गजानन कागणे, पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, सागर जगताप, संतोष अंदुरे, दिपक ठाणगे, रितेश काळे, शुभम चिनके, मल्हारी सुपरे, सुधीर शिवले, दिनेश मरकड, सागर वाळके, अजित कारकुड व प्रविण खोसे यांच्या पथकाने केली आहे.

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , , , , ,

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.