मुख्य मजकुराकडे जा
, १३ सप्टेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
क्राईम

पुण्यात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणारी टोळी गजाआड; गुन्हे शाखा युनिट २ कडून ३ जणांना बेड्या

2 मिनिटे वाचन

पुणे:- सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका मुख्य आरोपीसह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

घटनेची पार्श्वभूमी व गुन्हा दाखल

१२ सप्टेंबर २०२६ रोजी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही टवाळखोऱ्यांनी गाड्यांची तोडफोड करत स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२४(४), आर्म ॲक्ट ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५ व क्रि.लॉ.ॲ.क.७ नुसार गुन्हा (गु.र.क्र. ३३१/२०२६) दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि खबऱ्याच्या माहितीवरून सापळा

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट २ चे पथक समांतर तपास करत होते. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. तपासादरम्यान पोलीस अंमलदार शंकर कुंभार यांना आरोपी तळजाई वसाहत परिसरात आले असल्याची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने तळजाई वसाहत येथे सापळा रचून आरोपी सोहम हरिश चौहाण (वय २०, चव्हाणनगर, धनकवडी) याला दोन विधीसंघर्षित बालकांसह शिताफीने ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.

कारवाई करणारे पोलीस पथक

ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सपोनि स्वप्निल लोहार, मपोउप तेजश्री पवार, पोलीस अंमलदार शंकर कुंभार, कुंदन शिंदे, शंकर नेवसे, योगेश मांढरे, उज्वल मोकाशी, संतोष टकले, आमेकार कुंभार, साधना ताम्हाणे आणि विनायक वगारे यांचा समावेश होता.

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , ,

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.