पुणे : अन्न व औषध प्रशासनाने अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. पुणे विभागातील ११ अन्न परवाने निलंबित करण्यात आले असून पुरंदर तालुक्यात विनापरवाना सुरू असलेले एक हॉटेल बंद करण्यात आले.
कारवाईत परवाना, स्वच्छता, अन्नसाठवण, कच्च्या मालाची गुणवत्ता आणि आवश्यक नोंदी तपासण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या आस्थापनांना सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून गंभीर त्रुटींवर निलंबनाची कारवाई झाली.
गणेशोत्सवात प्रसाद, मिठाई आणि सामूहिक भोजनाची मागणी वाढते. त्यासाठी FDAने विशेष पथके तैनात करून उत्पादक, विक्रेते, हॉटेल आणि केटरिंग आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे.
नागरिकांनी पॅकबंद पदार्थांवरील उत्पादन व अंतिम वापर तारीख पाहावी, उघड्यावर ठेवलेले किंवा संशयास्पद रंग-वास असलेले पदार्थ टाळावेत आणि बिल घ्यावे. अन्नाविषयी तक्रार असल्यास नमुना, बिल आणि ठिकाणाची माहिती जतन करून FDAकडे द्यावी.
#PuneNews #MaharashtraNews #निर्भीडवर्तमान
अधिकृत स्रोत: अधिक माहिती


