मुख्य मजकुराकडे जा
, १९ ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
अंध व दुर्बल मतदारांसाठी मतदान सुविधा उपलब्ध करा; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देशअंध व दुर्बल मतदारांसाठी मतदान सुविधा उपलब्ध करा; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देशदीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रशासनाला निर्देशअल-निनोच्या सावटाखाली पुणे जिल्ह्यात पाणी नियोजनाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; स्थानिक स्वराज्य संस्थांना २० टक्के पाणी कपातीचे निर्देशउद्योगांना गती देण्यासाठी ‘पीएमआरडीए’चा मोठा पुढाकार: उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ‘फॅसिलिटेशन सेंटर’ सुरू होणार
राजकारण

अंध व दुर्बल मतदारांसाठी मतदान सुविधा उपलब्ध करा; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देश

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अंध व दुर्बल मतदारांसाठी सुविधा, सहायकाची आगाऊ सूचना व घोषणापत्राबाबत अधिकाऱ्यांना निर्देश.

✍
2 मिनिटे वाचन

📍विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

अंध व दुर्बल मतदारांना मतदानाचा हक्क सहजपणे बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांना पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले आहेत.

अंध व दुर्बल मतदार

निवडणूक प्रक्रियेत अंध व दुर्बल मतदारांना मतदानासाठी आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी निवडणूक संचालन नियम, १९६१ मधील नियम ४०(अ) नुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदान कक्षात प्रवेश करताना मतदारांसोबत कोणत्याही प्रकारची व्यक्ती उपस्थित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच, मतदानासाठी सहायकाची आवश्यकता असल्यास संबंधित मतदाराने मतदानाच्या किमान तीन दिवस आधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी सूचना देणे आवश्यक आहे.

अंध व दुर्बल मतदारांनी मतदानाच्या दिवशी आपली अडचण जाहीर करून विहित नमुन्यात घोषणापत्र सादर करावे. त्यानंतर पीठासीन अधिकारी नियमानुसार पुढील कार्यवाही करतील. सहाय्यकाच्या मदतीने मतदान झाल्यास त्याची नोंद नमुना १४-अ मध्ये ठेवणे बंधनकारक असेल. तसेच, या नोंदींची छाननी करून आवश्यक कागदपत्रे संबंधित निवडणूक निरीक्षकांकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अंध व दुर्बल मतदार

मतदान केंद्रांवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे. अंध व दुर्बल मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय मतदान करता यावे, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रशिक्षणात अंध व दुर्बल घटकांच्या मतदानासंबंधी सर्व बाबी स्पष्टपणे समजावून सांगाव्यात. सर्व मतदान केंद्रांना विहित नमुन्यातील घोषणापत्र नमुने व नमुना १४(ए) पुरेशा प्रमाणात पुरवावेत, साथीदार सुविधेसाठी आगाऊप्राप्त अर्जाची यादी व प्राप्त मतदारांची माहिती केंद्रनिहाय संबंधित केंद्राध्यक्षांना द्यावी, मतदानानंतर नमुना १४(ए) संकलित करून निरीक्षकांच्या छाननीसाठी उपलब्ध करून द्यावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अंध व दुर्बल मतदार

#पदवीधरमतदारसंघ #शिक्षकमतदारसंघ #पुणविभाग

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , ,

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.