मुख्य मजकुराकडे जा
, २६ ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
ब्रेकिंग
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे : मंत्री अतुल सावेपुण्यात एलपीजी सिलिंडर वाहतूक सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; निर्भीड वर्तमान फाउंडेशनची आरटीओकडे तक्रारपुणे जिल्ह्यातील १० दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत अन्नधान्य वाटप सुरू; स्थलांतरितांनाही कोणत्याही रास्तभाव दुकानातून मिळणार धान्यवाघोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: तब्बल १२.७५ लाख रुपयांचे ५१ गहाळ मोबाईल व टॅब मूळ मालकांना केले परतकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सदिच्छा भेट; विविध सामाजिक विषयांवर प्रदीर्घ चर्चा
क्राईम

गणेशोत्सवात आवाजमर्यादा मोडल्यास कारवाई; पुणे पोलिसांचा स्पष्ट इशारा

पुणे : गणेशोत्सवात न्यायालयाने निश्चित केलेल्या ध्वनिमर्यादांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. गणेश मंडळांना चार बास आणि चार टॉप वापरण्याची मर्यादा सांगण्यात आली आहे.

✍
1 मिनिटे वाचन

पुणे : गणेशोत्सवात न्यायालयाने निश्चित केलेल्या ध्वनिमर्यादांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. गणेश मंडळांना चार बास आणि चार टॉप वापरण्याची मर्यादा सांगण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांच्या माहितीनुसार दहीहंडी उत्सवातील आवाजमर्यादा आणि आदेशभंगाबद्दल ११६ खटले नोंदविण्यात आले. कारवाईदरम्यान प्लाझ्मा साऊंड आणि प्रेशरमीड उपकरणे जप्त करण्यात आली.

गणेशोत्सवात निवासी भाग, रुग्णालये, शाळा आणि शांतता क्षेत्रांतील नियम काटेकोरपणे लागू राहतील. मिरवणूक मार्गावर ध्वनीपातळी मोजण्यासाठी पोलीस पथके तैनात केली जाणार आहेत.

मंडळांनी परवान्यातील वेळा आणि ध्वनिमर्यादा पाळाव्यात. नागरिकांना त्रास होत असल्यास ठिकाण, वेळ आणि उपलब्ध नोंदींसह पोलीस नियंत्रण कक्षाकडे तक्रार करता येईल.

#PuneNews #MaharashtraNews #निर्भीडवर्तमान

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , ,

संबंधित बातम्या

1 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.