मुख्य मजकुराकडे जा
, २० ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
अंध व दुर्बल मतदारांसाठी मतदान सुविधा उपलब्ध करा; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देशअंध व दुर्बल मतदारांसाठी मतदान सुविधा उपलब्ध करा; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देशदीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रशासनाला निर्देशअल-निनोच्या सावटाखाली पुणे जिल्ह्यात पाणी नियोजनाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; स्थानिक स्वराज्य संस्थांना २० टक्के पाणी कपातीचे निर्देशउद्योगांना गती देण्यासाठी ‘पीएमआरडीए’चा मोठा पुढाकार: उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ‘फॅसिलिटेशन सेंटर’ सुरू होणार
महाराष्ट्र

MPSC पेपरफुटीप्रकरणी पुण्यात ७ सप्टेंबरला विद्यार्थी-शिक्षकांचा विराट आक्रोश मोर्चा

MPSC पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात ७ सप्टेंबर रोजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

✍
2 मिनिटे वाचन

पुणे: MPSC पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा आणि या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, यासह विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

सोमवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर चौक (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल) येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा MPSC आक्रोश मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ‘विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या भूमिकेतून आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

मोर्चाच्या परवानगीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त ऋषिकेश रावले आणि मिलिंद मोहिते यांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी देण्याची विनंती करण्यात आली. या वेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सुनील माने, प्रमोद पाटील, विविध क्लासेसचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

MPSC आक्रोश मोर्चाच्या परवानगीसंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची भेट
मोर्चाच्या परवानगीसंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

आयोजकांनी सरकारला दोन दिवसांचा वेळ देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या कालावधीत MPSC अध्यक्षांबाबत निर्णय न झाल्यास तसेच विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठिंबा देणार असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले. आगामी आंदोलनात विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा दावा करण्यात आला आहे.

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पुण्यात पत्रकार परिषद
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्यांबाबत पुण्यात आयोजित पत्रकार परिषद.

#MPSC #आक्रोशमोर्चा #PuneNews #StudentProtest #NirbhidVartman

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , , ,

संबंधित बातम्या

1 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.