डॉ. आंबेडकर युथ फाउंडेशनकडून SC/ST विद्यार्थ्यांसाठी ११ वी, १२ वी, NEET आणि MHT-CET चे मोफत कोचिंग; नाव नोंदणी सुरू
संगमनेर | प्रतिनिधी ; शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संगमनेर येथील डॉ. आंबेडकर युथ फाउंडेशन च्या वतीने एक स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ११ वी व १२ वी विज्ञान (Science) शाखेसह NEET आणि MHT-CET परीक्षांचे संपूर्ण मोफत कोचिंग (ट्यूशन) दिले जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना खालील सुविधा व मार्गदर्शन मोफत मिळणार आहे:
अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन: सर्व विषयांचे सखोल आणि सोप्या भाषेत अध्यापन.
ऑफलाइन आणि ऑनलाइन बॅचेस: विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन्ही पद्धतींनी शिकण्याची सोय.
नियमित परीक्षा (Test Series): विद्यार्थ्यांच्या तयारीचा अंदाज घेण्यासाठी वेळोवेळी टेस्ट घेतल्या जातील.
अभ्यास साहित्य: दर्जेदार स्टडी मटेरियल आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष.
“शिक्षण हा हक्क – आमचा संकल्प” हे ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर ठेवून संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्रशांत नामदेव गायकवाड यांनी केले आहे.
अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क:
संपर्क क्रमांक: 919657495575
कार्यालयीन पत्ता: रूम नं. २४, श्रमपरिहार सोसायटी, मालदाड रोड, संगमनेर.
“शिका संघटित व्हा संघर्ष करा”


