मुख्य मजकुराकडे जा
, २७ ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
ब्रेकिंग
भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीत बेंगळुरूमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात; ४०० कुटुंबांकडून आंबेडकरी विचारांची परंपरा कायमतुर्भेत अवैध इंधन चोरीचा भांडाफोड; ९४ लाखांच्या मुद्देमालासह दोन टँकर जप्त, ५ जणांवर गुन्हा दाखलसंगमनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा धडक छापा: १५ लाखांचा संशयास्पद धनेडाळ व बडीशेपचा साठा जप्त; ‘फेस्टिव्हल ड्राईव्ह’ अंतर्गत मोठी कारवाईआदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशपीएमआरडीएचा डिजिटल कारभाराकडे नवा टप्पा: क्षेत्रीय पाहणी गतिमान करण्यासाठी ‘PMRDA Q-Pad’ ॲपचे प्रशिक्षण
संपादकीय

भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीत बेंगळुरूमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात; ४०० कुटुंबांकडून आंबेडकरी विचारांची परंपरा कायम

बेंगळुरूत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमराव यशवंत आंबेडकर यांचा संवाद; सम्यक प्रबोधन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ४०० कुटुंबांकडून विचारांचा वारसा.

✍
2 मिनिटे वाचन

बेंगळुरू : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे ‘सम्यक प्रबोधन प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि ज्येष्ठ आंबेडकरी नेते भीमराव यशवंत आंबेडकर यांनी उपस्थित राहून जनसमुदायाशी संवाद साधला.

परराज्यात राहूनही आंबेडकरी चळवळ आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अखंड सुरू ठेवणाऱ्या येथील मराठी बांधवांच्या उपक्रमाचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले. ४०० मराठी कुटुंबांकडून विचार आणि संस्कृतीचे जतन महाराष्ट्रातून अनेक वर्षांपूर्वी उपजीविकेसाठी बेंगळुरू येथे स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी ‘सम्यक प्रबोधन प्रतिष्ठान’ची स्थापना केली आहे.

आजच्या घडीला बेंगळुरूमध्ये वास्तव्यास असलेली अंदाजे ४०० कुटुंबे या संस्थेच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीशी घट्ट जोडलेली आहेत. ही सर्व कुटुंबे चळवळीशी निष्ठा राखून महाराष्ट्राची संस्कृती आणि समतेचे विचार परराज्यातही जपत आहेत. पुढील पिढ्यांपर्यंत प्रबोधनाचा वारसा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तथागत गौतम बुद्ध पौर्णिमा आणि ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार आणि बुद्ध धम्माचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य ही संस्था अविरत करत आहे.

भीमराव आंबेडकर यांचे विचार उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना भीमराव आंबेडकर म्हणाले की, “धम्मचक्र प्रवर्तन दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे स्मरण करून देणारा ऐतिहासिक दिवस आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भौगोलिक अंतर कितीही असले, तरी आपल्या विचारांशी, संस्कृतीशी आणि चळवळीशी जोडलेले राहण्याची खरी प्रेरणा अशा उपक्रमांमधून मिळते.” यावेळी त्यांनी सम्यक प्रबोधन प्रतिष्ठानच्या धम्मकार्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

‘नमो बुद्धाय! जय भीम! जय संविधान!’ या घोषणांनी कार्यक्रमाचा परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्याला बेंगळुरू व परिसरातील नागरिक, महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , , ,

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.