मुख्य मजकुराकडे जा
, २८ ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
ब्रेकिंग
भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीत बेंगळुरूमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात; ४०० कुटुंबांकडून आंबेडकरी विचारांची परंपरा कायमतुर्भेत अवैध इंधन चोरीचा भांडाफोड; ९४ लाखांच्या मुद्देमालासह दोन टँकर जप्त, ५ जणांवर गुन्हा दाखलसंगमनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा धडक छापा: १५ लाखांचा संशयास्पद धनेडाळ व बडीशेपचा साठा जप्त; ‘फेस्टिव्हल ड्राईव्ह’ अंतर्गत मोठी कारवाईआदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशपीएमआरडीएचा डिजिटल कारभाराकडे नवा टप्पा: क्षेत्रीय पाहणी गतिमान करण्यासाठी ‘PMRDA Q-Pad’ ॲपचे प्रशिक्षण
क्राईम

तुर्भेत अवैध इंधन चोरीचा भांडाफोड; ९४ लाखांच्या मुद्देमालासह दोन टँकर जप्त, ५ जणांवर गुन्हा दाखल

तुर्भेत अवैध इंधन उपशावर भरारी पथकाची कारवाई. दोन टँकर, १४ हजार लिटर डिझेल व संशयास्पद द्रवपदार्थ जप्त; पाच जणांवर गुन्हा नोंद.

✍
2 मिनिटे वाचन

मुंबई : तुर्भे परिसरात सुरू असलेल्या अवैध इंधन उपशावर मुंबई-ठाणे शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये बेकायदेशीररीत्या डिझेल भरत असताना पथकाने छापा टाकून दोन टँकरसह सुमारे १४ हजार लिटर डिझेल आणि २५ हजार लिटर पेट्रोलियमसदृश संशयास्पद द्रवपदार्थ असा एकूण तब्बल ९४ लाख ३६ हजार ७०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रंगेहात पकडले डिझेलचे रॅकेट मिळालेल्या माहितीनुसार, तुर्भे परिसरातील एका मोकळ्या जागेत डिझेलची वाहतूक करणाऱ्या ‘WB 19 L 2981’ या टँकरच्या आउटलेटमधून अवैधरीत्या इंधन काढले जात होते. हे चोरलेले डिझेल ‘MH 46 BM 9202’ या दुसऱ्या टँकरच्या इंधन टाकीत भरले जात असल्याची खात्रीशीर माहिती भरारी पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी अचानक धाड टाकली असता हा संपूर्ण प्रकार रंगेहात उघडकीस आला.

जप्त केलेला मुद्देमाल कारवाईदरम्यान पथकाने खालील मुद्देमाल ताब्यात घेतला: * १४ हजार लिटर डिझेल * २५ हजार लिटर पेट्रोलियमसदृश संशयास्पद द्रवपदार्थ * अवैध इंधन उपशासाठी वापरण्यात आलेले दोन्ही मोठे टँकर * जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची अंदाजे एकूण किंमत ९४ लाख ३६ हजार ७०८ रुपये आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपनियंत्रक शिधावाटप (अंमलबजावणी) गणेश बेल्लाळे यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली.

या कारवाईत नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई कार्यालयाच्या भरारी पथकातील सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप निरीक्षक अमोल बुरटे, दिपेंद्र परुळेकर, राहुल इंगळे आणि विकास नागदिवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अवैध इंधनाचा हा साठा नेमका कुठून आणला जात होता आणि तो कुठे विकला जाणार होता, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा अधिक तपास तुर्भे पोलीस करत आहेत.

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , ,

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.