कात्रज परिसरात जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक; १ लाख ३० हजारांचे ४ मोबाईल जप्त

पुणे: पुणे शहरातील कात्रज-कोंढवा रोडवर भररस्त्यात नागरिकांना मारहाण करून मोबाईल फोनची जबरी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरट्याकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
दिनांक २४ मे २०२६ रोजी रात्री १०:३५ च्या सुमारास कात्रज-कोंढवा रोडवरील माऊलीनगर बस स्टॉपजवळ फिर्यादी दुध आणण्यासाठी पायदळ जात होते. यावेळी तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान, हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी राहुल सिताराम निकम (वय २८, रा. लक्ष्मी पार्क, तरवड वस्ती, महंमदवाडी, कोंढवा) आणि त्याच्या दोन साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी राहुल निकम हा वंडरसिटी रोडवर असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेले १ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग यांच्या नेतृत्वात पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकातील मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, अवधूत जमदाडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी यशस्वी केली आहे.
ही बातमी कशी वाटली?
टॅग: #PunePolice #CrimeBranchPune #BikeTheft #PuneCrimeNews #PoliceAction #MarathiNews #पुणेपोलीस #गुन्हेशाखा #वाघोली #मोटारसायकलचोरी, #PunePolice #CrimeNews #PuneCrime #BhartiVidyapeethPolice #RobberyCaseSolved #PuneCity #NirbhidVartman #पुणेपोलिस #गुन्हेगारी #कात्रज




प्रतिक्रिया व्यक्त करा