मुख्य मजकुराकडे जा
, २६ ऑक्टोबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
ब्रेकिंग
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे : मंत्री अतुल सावेपुण्यात एलपीजी सिलिंडर वाहतूक सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; निर्भीड वर्तमान फाउंडेशनची आरटीओकडे तक्रारपुणे जिल्ह्यातील १० दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत अन्नधान्य वाटप सुरू; स्थलांतरितांनाही कोणत्याही रास्तभाव दुकानातून मिळणार धान्यवाघोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: तब्बल १२.७५ लाख रुपयांचे ५१ गहाळ मोबाईल व टॅब मूळ मालकांना केले परतकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सदिच्छा भेट; विविध सामाजिक विषयांवर प्रदीर्घ चर्चा
क्राईम

अग्निशस्त्राने खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शाखेची कारवाई

आंबेगाव पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट-२ ने आंबेगाव दरी पूल परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली.

✍
1 मिनिटे वाचन

पुणे: अग्निशस्त्राचा वापर करून जीवघेणा हल्ला केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. आंबेगाव परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

पुणे शहर पोलिसांच्या प्रेसनोटनुसार, आंबेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व शस्त्रासंबंधी कलमांखाली गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अतिष उमेश मोरे (वय २९, रा. सिंहगड रोड, पुणे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता.

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक शहरातील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी आणि महेश मंडलिक यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी आंबेगाव दरी पुलाजवळील परिसरात असल्याची माहिती मिळाली.

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या निदर्शनास आणून कायदेशीर कारवाईचे आदेश घेतल्यानंतर युनिट-२ च्या अधिकारी व अंमलदारांनी दरी पूल परिसरात सापळा रचला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात अटक केली.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास आंबेगाव पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

#PunePolice #CrimeBranch #Ambegaon #PuneCrime #NirbhidVartmaan

ही बातमी कशी वाटली?

टॅग: , , , , , ,

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कॉपी करू नका.