मुख्य मजकुराकडे जा
शनिवार, १२ सप्टेंबर २०२६PRGI No: MHAMAR/2023/90686
निवनिर्भीडवर्तमान

निडर लेखणी, निष्पक्ष बातमी..!

ब्रेकिंग
महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात आरपीआय (A) आंबेडकर पक्ष अधिक आक्रमक होणार; संगमनेरच्या आढावा बैठकीत विविध सामाजिक प्रश्नांवर लढा उभारण्याचा निर्धार

3 मिनिटे वाचन
संगमनेर येथे आरपीआय (A) आंबेडकर पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकीत मान्यवरांचा सत्कार सोहळा
संगमनेर: शासकीय विश्रामगृहात आयोजित आरपीआय (A) आंबेडकर पक्षाच्या आढावा बैठकीत उपस्थित राज्य अध्यक्ष बाळासाहेब पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे व इतर मान्यवर.

संगमनेर (दि. २३ ऑगस्ट): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाऊ निकाळजे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील साहेब आणि महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सुनिताताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शासकीय विश्रामगृह, संगमनेर येथे उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी आढावा बैठक व महाराष्ट्र राज्य कमिटीचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला.

 

 

 

 

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी उपस्थितांचे जंगी स्वागत केले.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब पवार होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र महासचिव दादासाहेब ओव्हाळ, महाराष्ट्र संघटक सचिव कैलास जोगदंड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे आणि उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस प्रवीणभाऊ जगधने यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक प्रश्न, शिक्षण व रोजगारावर मंथन

बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वाढती महागाई, रोजगाराचा प्रश्न, युवकांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व शैक्षणिक अडचणी, महिला, शेतकरी व कामगारांचे प्रश्न यांवर उपस्थितांनी विचार मांडले. युवकांना कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पक्षाच्या वतीने आगामी काळात आक्रमक लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

 

 

या प्रसंगी पक्षाची ध्येय-धोरणे विचारात घेऊन शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. संघटन वाढीसाठी खालीलप्रमाणे नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या:

 * उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष: रॉकी प्रदीप लोंढे

* संगमनेर तालुका अध्यक्ष: प्रवीण गणेश आव्हाड

* संगमनेर महिला आघाडी शहराध्यक्ष: सौ. वैष्णवी सचिन जाधव

* जळगाव जिल्हा (मराठा आघाडी) अध्यक्ष: शरद नामदेव सोनवणे

* महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी: घोडके बाबा

आगामी निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

अहिल्यानगर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा असलेल्या आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या सक्षम उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याची आणि निवडणूकपूर्व नियोजनाची संपूर्ण जबाबदारी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

 

 

 

 

 

प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

या सोहळ्यास जळगाव जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ महिराळे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख अशोकभाऊ गायकवाड, दक्षिण अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ गायकवाड, रमाआई महिला प्रतिष्ठानच्या राज्य सचिव सौ. राजवतीताई दारोळे, उत्तर अहिल्यानगर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा जयाताई डोळस, देवा ग्रुप अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरखभाऊ शिंदे, आयटी सेल नाशिक जिल्हाध्यक्ष सागरभाऊ गायकवाड, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष श्रीकांत म्हंकाळे, संगमनेर युवक शहराध्यक्ष सचिनभाऊ जाधव हे उपस्थित होते.

तसेच जिल्हा उपाध्यक्ष सचिन घोडके, जिल्हा संघटक नाना सांगळे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष बापू भोईटे, तालुका उपाध्यक्ष रमेश थोरात, तालुका उपाध्यक्ष प्रशांत शिंदे, शहर अध्यक्ष फरीद शेख, विकी पाटोळे, राजू जवारे, शुभम शेळके, राहुल बियाणी, आलोक थोरात, विकी लोंढे, अतुल दारोळे, अविनाश आव्हाड, संकेत खरात, अशोक साळवे, रविंद्र जमधडे, कार्तिक खरात, गणेश भालेराव, सार्थक खरात, सौ. करुणा डोळस, भारती मिठ्ठा यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट व यशस्वी आयोजन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी केले होते.

जय भीम! जय भारत! जय संविधान!

ही बातमी कशी वाटली?

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नका.