पुणे : गणेशोत्सवात न्यायालयाने निश्चित केलेल्या ध्वनिमर्यादांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. गणेश मंडळांना चार बास आणि चार टॉप वापरण्याची मर्यादा सांगण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांच्या माहितीनुसार दहीहंडी उत्सवातील आवाजमर्यादा आणि आदेशभंगाबद्दल ११६ खटले नोंदविण्यात आले. कारवाईदरम्यान प्लाझ्मा साऊंड आणि प्रेशरमीड उपकरणे जप्त करण्यात आली.
गणेशोत्सवात निवासी भाग, रुग्णालये, शाळा आणि शांतता क्षेत्रांतील नियम काटेकोरपणे लागू राहतील. मिरवणूक मार्गावर ध्वनीपातळी मोजण्यासाठी पोलीस पथके तैनात केली जाणार आहेत.
मंडळांनी परवान्यातील वेळा आणि ध्वनिमर्यादा पाळाव्यात. नागरिकांना त्रास होत असल्यास ठिकाण, वेळ आणि उपलब्ध नोंदींसह पोलीस नियंत्रण कक्षाकडे तक्रार करता येईल.
#PuneNews #MaharashtraNews #निर्भीडवर्तमान
अधिकृत स्रोत: अधिक माहिती



1 Comment
Pingback: मध्य पुण्यात गणेशोत्सव तयारीला चार दिवसांची मुदत