निर्भीड वर्तमान / विशेष प्रतिनिधी (मुळशी-पुणे) :- केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (MJP) मुळशी टप्पा १. व टप्पा २ सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत. कामाचा दर्जा, साहित्याची साठवणूक, प्रत्यक्ष वापर आणि बिलिंग प्रक्रियेबाबत प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
लाखोंचे साहित्य उन्हापावसात; बिलिंग प्रक्रियेवर प्रश्न
मुळशी तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या व्यासाचे पाइप कोणत्याही संरक्षणाशिवाय उघड्यावर पडून असल्याचे दिसते. अनेक ठिकाणी या साहित्याभोवती झाडे-झुडपे वाढली असून, काही पाइपवर रंग उडालेला, गंज किंवा खराब स्थिती दिसत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष कामाची आवश्यकता नसताना साहित्य वेळेआधी मागवून ‘Material-at-Site’ अथवा इतर बिलिंगसाठी दाखवण्यात आले का, याची अधिकृत कागदपत्रांतून पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अकोले येथील पाण्याच्या टाकी व पाइपलाइनच्या कामावर प्रश्न
मुळशी तालुक्यातील अकोले परिसरातील पाण्याच्या टाकीच्या आणि संबंधित पाइपलाइन कामांच्या दर्जाबाबतही तक्रारदारांनी आक्षेप नोंदविले आहेत. काही ठिकाणी पाइप फुटणे असल्याचा दावा करण्यात आला आहे. RCC बांधकाम, जिन्याचे काम, finishing आणि एकूण workmanship यांची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करावी, तसेच hydro-pressure test आणि आवश्यक quality-control records तपासावेत, अशी मागणी आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित उप अभियंता यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या कार्यक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर मुळशी तालुक्यातील अनेक कामांच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत वारंवार गंभीर तक्रारी समोर येत आहेत. प्रत्यक्ष स्थळांवर निकृष्ट दर्जाचे काम, साहित्याची अव्यवस्थित साठवणूक, पाइपलाइनमधील त्रुटी आणि कामाच्या देखरेखीतील कथित दुर्लक्ष दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्रुटी सातत्याने समोर येत असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रभावी नियंत्रण व कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

या सातत्यपूर्ण दुर्लक्षामागे केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा आहे की संबंधित अधिकारी व कंत्राटदार कल्याण टोल कंपनी मध्ये कोणते आर्थिक हितसंबंध, अनुचित जवळीक अथवा संगनमत आहे, याची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील शिरूर व मुळशी विभागातील सर्व प्रमुख कामांची MB, रनिंग बिल, गुणवत्ता तपासणी अहवाल, TPI नोंदी आणि कंत्राटदारांना करण्यात आलेली देयके तपासल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.
साहित्य साठवणूक आणि गंजलेले reinforcement
दारवली, पिरंगुट, पौड आणि इतर भागांतील छायाचित्रांत reinforcement steel, पाइप, fittings व इतर साहित्य उघड्यावर पडलेले दिसते. ऊन-पाऊस, माती आणि दीर्घकाळ उघड्यावर राहिल्याने साहित्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला का, याची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कामगार सुरक्षेकडेही लक्ष देण्याची मागणी
कामाच्या ठिकाणी कामगारांना हेल्मेट, बूट, PPE kit यांसारखी मूलभूत सुरक्षा साधने पुरवली जात आहेत का आणि कंत्राटदाराकडून सुरक्षा नियमांचे पालन होते का, याचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.
MB, रनिंग बिल आणि स्टॉक रजिस्टरची पडताळणी आवश्यक
तक्रारदारांनी Tender/Work Order, BOQ, Measurement Book (MB), Running Account Bills, Stock Register, pipe purchase invoices, Quality Control Test Reports, cube/steel tests, hydro-pressure test reports आणि Third Party Inspection reports यांची परस्पर पडताळणी करून प्रत्यक्ष काम, वापरलेले साहित्य आणि अदा झालेली रक्कम यांचा स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक अहवाल तयार करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणात आर्थिक किंवा तांत्रिक गैरव्यवहार झाला आहे का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे . महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी किंवा संबंधित कंत्राटदार यांची अधिकृत बाजू प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
#जलजीवनमिशन #MJP #मुळशी #पुणे #निर्भीडवर्तमान


