पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी):– आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील मंडळांना मंडप परवाना आणि विविध शासकीय परवानग्या मिळवण्यासाठी आता महापालिकेच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मंडळांसाठी ऑनलाइन संगणकीय प्रणाली आणि एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त नियोजनानुसार ही प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका संकेतस्थळावरून गणेश मंडळ कार्यकर्ते थेट अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. यामुळे परवानगी मिळण्यास होणारा विलंब टळणार असून पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.
एक खिडकी योजनेद्वारे सर्व परवानग्या एकत्र
महापालिकेच्या विविध प्रादेशिक कार्यालयांच्या अंतर्गत एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पोलीस विभाग, वाहतूक शाखा, अग्निशामक दल आणि महापालिकेचा परवाना विभाग यांच्या समन्वयाने एकाच ठिकाणी सर्व मंजुरी दिली जात आहे. खड्डेमुक्त रस्ते आणि सुरक्षित उत्सव साजरा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने विशेष नियमावली देखील जारी केली आहे.
उत्सवा दरम्यान सुरक्षेचे सर्व नियम पाळणे, वाहतुकीस अडथळा निर्माण न करणे आणि पर्यावरणापूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
#PCMC #PimpriChinchwad #Ganeshotsav2026 #PCMCNews #PimpriNews



1 Comment
Pingback: PCMC कडून अग्नि सुरक्षितता प्रमाणपत्र नसलेल्या आस्थापनांवर कारवाईचा इशारा