क्राइमताज्या घडामोडीपुणे

Pune Police; भिवंडी शहरातील खुनाच्या गुन्ह्यात फरार आरोपी केला जेरबंद

पुणे, निर्भीड वर्तमान:- भिवंडी येथे एका व्यक्तीला गंभीर रित्या जखमी करून आरोपी रामनाथ उर्फ पापा मेमीनाथ सोनवणे, वय 22 हा फरार होता वेळोवेळी आपले लोकेशन बदल करत असल्याने तो पोलीसांना मिळुन येत नव्हता परंतू बंडगार्डन पोलीस स्टेशन तपास पथकाने शिताफीने या आरोपीला जेरबंद केले आहे.

बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे व पो शि ज्ञाना बडे, मनोज भोकरे यांनी cctv फुटेज व गोपनीय बातमीदाराच्या बातमीदारामार्फत माहिती मिळवली कि रामनाथ उर्फ पापा मेमीनाथ सोनवणे हा ताडीवाला रोड, पुणे येथे आला आहे.

तात्काळ ताडीवाला रोड येथे पोलीसांनी सापळा रचून आरोपी रामनाथ उर्फ पापा मेमीनाथ सोनवणे याला ताब्यात घेतले व त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. आरोपीस भिवंडी शहर पो. स्टे. पोलीस पथक यांचे ताब्यात दिले असून आरोपीवर भिवंडी शहर गुन्हा नोंद क्रमांक. 302/2024 भा.द.वि 302,307,363,143,144,147,367,364,34 असे गुन्हे दाखल आहेत. तर पुढील तपास भिवंडी शहर पोस्टे हे करीत आहेत.

सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील मॅडम, साहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो. हवा सुधीर घोटकुले, पो.शि ज्ञाना बडे,शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!