क्राइमताज्या घडामोडीपुणे

Pune Police : घरफोडी करणा-या अट्टलचोरांना खडकी पोलीसांनी २४ तासात केले जेरबंद

पुणे, निर्भीड वर्तमान:- खडकी येथील अयप्पा मंदिरा शेजारी, रेंजहिल्स येथे एका बंद घराचा कडीकोंडा तोडुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची फिर्याद दिल्याने खडकी पोलीस स्टेशन Pune Police येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.दाखल गुन्हाचा विनाविलंब करत खडकी पोलीस स्टेशनचे तपासपथक यांनी कराड येथुन सर्व आरोपींना अटक करून १२,७०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

Pune Police
Pune Police

सविस्तर;

घरफोडीच्या दाखल गुन्हयाचा तपास करण्यासाठी Pune Police खडकी पोलीस स्टेशन तपासपथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक आण्णा गुंजाळ, पो.हवा. उध्दव कलंदर, पो.ना. संदेश निकाळजे, पो. अंम.अतुल इंगळे, प्रताप केदारी, ऋषिकेश दिघे असे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुजेट तपासणी करत असतांना पो.अंम.ऋषिकेश दिघे यांना त्यांचे आपल्या खास बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, घरफोडी करणारे आरोपी हे तालुका कराड, जि. सातारा येथे चोरी केलेल्या माल विक्री करीता घेवुन गेले आहेत.

मिळालेल्या बातमी वरिष्ठ अधिकारी यांना कळवून त्यांच्या आदेशानुसार Pune Police खडकी पोलीस ठाणे कडील तपासपथक स्टाफ तात्काळ कराडला जावुन शिताफीने आरोपीचा माग काढून कराड येथुन आरोपी १) अनिल संजय बुद्देवार, वय २८ वर्षे, रा. २) रोशन अरविंद सोनावले, वय २६ वर्षे, ३) संदिप हरी इंगळे, वय ३६ वर्षे,यांना ताब्यात घेतले व घरफोडीबाबत चौकशी केली असता या आरोपींनी गुन्ह्याची कबुली देवुन चोरीचा मुद्देमाल हा कराडच्या दत्तात्रय भीमराव पवार, वय ४३ वर्षे, याच्याकडे दिले असल्याचे सांगितले पोलीसांनी पवारचा शोध घेवुन त्यालाही ताब्यात घेवुन त्याचेकडुन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला तर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन महिंद्रा स्कार्षीयो क्र. एम.एच. ५० ए ४४४५ तसेच अँटो रिक्षा क्र. एम.एच. १४ एच. एम. ७८६२ ही जप्त केली आहे.

या सर्व आरोपीकडुन गुन्ह्यातील चोरीस गेले रु. १,७०,०००/- रु. सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरेलेले १०,००,०००/- रु. चे चार चाकी स्कार्षीयो तसेच १,००,०००/- रु. कि.चे. अँटो रिक्षा असे एकुण १२,७०,०००/- रु.कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या आरोपींना गुन्ह्याचे पुढील अधिक तपासकामी अटक करण्यात आलेली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक आण्णा गुंजाळ हे करीत आहेत.

अटक केलेल्या आरोपीतांपैकी, रोशन अरविंद सोनावले यांच्यावर यापुर्वी पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, मुंबई असे विविध ठिकाणी १५ पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. प्रविण पवार साो, सह पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. मनोजकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुक्त साो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ ०४, पुणे शहर, मा. आरती बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर श्री. गिरीशकुमार दिघावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आण्णा गुंजाळ, पोलीस उप निरीक्षक तानाजी कांबळे, पो.हवा. उध्दव कलंदर, पो.ना. संदेश निकाळजे, पो. अंम. अतुल इंगळे, प्रताप केदारी, ऋषिकेश दिघे अनिकेत भोसले, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!