ताज्या घडामोडीपुणे

६,५०,०२०/- रूपये किंमतीचा ३२ किलो ५०१ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने केला जप्त..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दिनांक १२/०१/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक -२ गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत पट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार, योगेश मांढरे यांना मिळालेल्या माहितीवरुन रास्ता पेठ येथे दोन इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाली.

मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथक – २, कडील अधिकारी व अंमलदार यांनी वरील परीसरात सापळा लावला असता रास्ता पेठ, द क्रिश लॉज समोर सार्वजनिक रोडवर अक्षय अशोक रोकडे, वय २१ वर्षे, व करण / धम्मदिप विलास सुरवसे, वय- १९ वर्षे, यांच्याकडुन एकुण ६,८१,५२०/- रु किचा ऐवज त्यामध्ये ६,५०,०२० /- रू. किचा ३२ किलो ५०१ ग्रॅम गांजा, २०,०००/- रु. किमतीचे दोन मोबाईल फोन व १,०००/- रु. किची लाल सुटकेस, ५००/- रु किमंतीची एक हिरवट रंगाची सॅकबॅग व १०,०००/- रुपये रोख रक्कम असा ऐवज व अंमली पदार्थ अनाधिकाराणे व बेकायदेशिर रीत्या जवळ बाळगताना मिळुन आल्याने दोघा आरोपी विरुध्द समर्थ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १५/२०२३ एन.डी.पि.एस. अॅक्ट ८ (क), २०(ब) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण अंमली पदार्थ विरोधी पथक – २ गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, गुन्हे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २, श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक – २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक, एस. डी. नरके, पोलीस उप-निरीक्षक, दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार, संतोष देशपांडे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, युवराज कांबळे, दिशा खेवलकर, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविन्द्र रोकडे व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!