क्राइमताज्या घडामोडीपुणे

सासुकडे १० लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी बापानेच केला मुलीचा अपहरणाचा बनाव

आरोपीस बापास ०६ तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ०२ अपहरीत मुलींची सुखरूप केली सुटका वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- वाकड पोलीस स्टेशनकडील अधिकारी पोउपनि रोहीत दिवटे हे रात्रगस्त करीत असताना कोकणे चौक येथे काही महीला व पुरुष घाईगडबडीत गोंधळलेल्या अवस्थेत जाताना दिसुन आल्याने त्यांना थांबवुन पोलीसांनी विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, त्यांचे घरातील दोन लहान मुली रात्री राखी खरेदी करणेकरीता गेल्या होत्या त्या अदयाप पर्यत परत आलेल्या नाहीत. पोउपनि रोहीत दिवटे यांनी कळलेल्या गोष्टीची तात्काळ दखल घेत त्या सर्वाना वाकड पोलीस स्टेशन येथे घेवुन आले. त्यांचेकडुन माहीती प्राप्त करता असे समजले की, सारीका कैलास ढसाळ वय ३८ वर्षे या त्यांची आई पुष्पा आल्हाट यांचे सोबत रहात असुन त्यांच्या लग्न झालेल्या दोन बहीणी मुलांसोबत रक्षाबंधन निमीत्त रहाटणी येथे आलेल्या होत्या. त्यातील त्यांची बहीण शितल सचिन मोहीते यांची मुलगी वय १५ वर्षे व सारीका कैलास ढसाळ यांची मुलगी वय ०२ वर्षे या राखी खरेदी करणेकरीता घराचे बाहेर गेल्या होत्या. त्या दोघीही त्यावेळेपासुन मिळुन येत नाहीत मिळालेल्या माहितीनुसार पोउपनि रोहीत दिवटे यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.

दाखल झालेल्या गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादी यांचे घरातील सर्व व्यक्तींची चौकशी केली. त्यावेळी अपहरत मुलीचे वडील सचिन मोहीते हेही हजर होते. त्यांनीही फिर्यादी प्रमाणेच हकीकत सांगीतली व घटनेची माहीती त्यांना प्राप्त झाले नंतर वाघोली येथुन आल्याचे सांगीतले. तपास पथकातील अधिकारी, अंमलदार अपहरीत मुली ज्या रस्त्याने बाहेर पडल्या होत्या तेथील सिसीटीव्ही फुटेज पाहणी व स्थानिक नागरीक तसेच दुकानदारांकडे चौकशी करणे सुरु केली होती. यादरम्यानचे काळात सचिन मोहीते हे कार सर्व्हिसींग साठी सोडणेसाठी जात असलेचे सांगुन कोठेतरी निघुन गेले होते अपहरत मुलगी हीची आई शितल सचिन मोहीते यांनी सकाळी चौकशी करीत असलेल्या पोलीस अधिका-यांना सांगीतले की, फिर्यादी सारीका ढसाळ यांचा सुमारे ०३ महीने पुर्वी गहाळ झालेल्या मोबाईल नंबर वरुन त्यांना त्यांचे पति सचिन मोहीते यांचे मोबाईलवर सकाळी ०७.१५ वा. फोन आला की ‘तुमच्या मुली सुखरुप पाहीजे असतील तर पोलीसांना काही न सांगता १० लाख रुपये दया नाहीतर तुमच्या मुलींचे बरेवाईट करेन’ अशी धमकी दिलेची माहीती दिल्यावरुन शितल मोहीते यांना फोनवर आपले बोलणे झाले अथवा आपले पतिचे बोलणे झाले याबाबत विचारले तर त्यांनी पति सचिन मोहीते याचेच बोलणे झाले आहे असे सांगीतले. यादरम्यान सिसीटीव्ही पाहणी करीत असतांना मुली घरातुन बाहेर पडुन रस्त्यावर येवुन कोणत्यातरी कार मध्ये बसुन जाताना दिसल्या व ती कार सचिन मोहीते यांच्याकडे असणा-या कारचे वर्णनाशी मिळती जुळती होती. त्यामुळे सचिन मोहीते यांना काहीतरी माहीती असुन ते जाणीवपूर्वक कुठेतरी निघुन गेले असल्याचे संशय पोलीसांना आला.

सचिन मोहीते याचे मोबाईल फोनचे लोकेशन द्वारे माहीती घेतली असता तो पुन्हा वाघोली येथे गेलेचे निष्पन्न झालेने तपास पथकातील सपोफी काळे, सपोफी इनामदार व पोहवा. गिरे यांनी तात्काळ वाघोली येथे जावुन सचिन मोहीते यास तांत्रीक तपासाद्वारे ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने दोन्ही मुलींचे अपहरण हे त्यांची सासु पुष्पा आल्हाट यांना भिती दाखवुन त्यांचे बँकेत असणारे १० लाख रुपये मिळविण्यासाठी अपहरणाचा बनाव केल्याचे सांगीतले. त्यास दोन्ही मुली कोठे आहेत याबाबत विचारणा केली असता त्याने सांगीतले की, मुलींना वाघोली येथे एका ठिकाणी ठेवले असुन त्यांना सकाळी १०.०० वाजल्या नंतर वाघोली येथुन निघुन मनपा पुणे येथे येण्यास सांगीतले आहे. त्यामुळे पोलीसांनी लागलीच मुली ठेवल्या होत्या त्या ठिकाणी जावुन पाहणी केली परंतु तेथे मुली मिळुन आल्या नाहीत. मुली पीएमपीएमल बसने प्रवास करीत मनपा पुणे येथे पोहोचतील याहेतुने सर्व अधिकारी अंमलदार मनपा येथे जावुन थांबले. परंतु प्रवासाला लागणारे वेळेपेक्षा जास्त वेळ झाला तरी मुली मनपा पुणे येथे पोहोचल्या नाहीत. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढत गेली होती मा. वरिष्ठांना या बाबत माहीती दिलेवरुन गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांचेकडील अजुन ०३ पथकही पुणे मनपा येथे रवाना करण्यात आले. पीएमपीएमल व्यवस्थापन यांचेशी बोलुन चालक वाहक यांचे वॉट्सअप ग्रुप वर दोन्ही मुलींचे फोटो टाकुन जर त्या प्रवास करताना मिळुन आल्यास ताब्यात घेणेबाबत कळविले होते. त्यानुसार दुपारी 1.30 वाजता मुली पीएमपीएमल बसने मनपा पुणे येथे आलेवर पोहवा. गवारी, पोना. चव्हाण यांनी त्यांना ओळखून सुखरुप ताब्यात घेतले.

आरोपी सचिन मोहीते याने गुन्हा हा सासु पुष्पा आल्हाट यांचेकडुन १० लाख रुपयांची खंडणी वसुल करणेसाठी केल्याचे निष्पन्न झालेने सदर गुन्हयात भादविक ३६४ (अ), ३८५ चा अंतर्भाव करून आरोपी सचिन मोहीते यास गुन्हयात अटक केली आहे त्याचेकडुन गुन्हा करणेसाठी वापरलेला मोबाईल फोन हस्तगत करणेत आला असून गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे साो, सह. पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे साो, पोलीस उप आयुक्त, परि- २ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री.गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि.संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, पोउपनि रोहीत दिवटे, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. वंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा . प्रमोद कदम, पोहवा. अतिश जाधव, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि. भास्कर भारती, पोशि. अजय फल्ले, पोशि रमेश खेडकर, पोशि. कौंतेय खराडे, पोशि. सागर पंडीत ( परि – ०२ कार्यालय) तसेच गुन्हे शाखा युनिट नं. ०४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. शंकर आवताडे, पोउपनि रायकर व अंमलदार यांनी मिळुन केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!