ताज्या घडामोडीपुणे

विद्यमान आमदारच झाले सेक्सटॉर्शनचे शिकार.!

सायबर पोलीसांनी गुन्ह्यातील आरोपीस राजस्थान येथून केले जेरबंद..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- पुणे शहरात वास्तव्यास असलेले विद्यमान आमदार यांचा मोबाईल क्रमांक सोशल मिडीया वरून प्राप्त करून व्हाट्सॲप वर संपर्क करून त्यांना वेळोवेळी अश्लिल संदेश पाठवले तसेच अश्लिल व्हिडीओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर रेकॉर्ड केलेले व्हिडीओ कॉल आमदार यांचे फेसबुकवर असलेले मित्र यांना पाठविण्याची धमकी देऊन आमदारांना १ लाख रूपये इतक्या रकमेच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली होती. मागणी केलेली रक्कम तात्काळ दिली नाही तर रेकॉर्ड केलेला अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी आमदारांना दिल्याने सायबर पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नं. ०५/२०२३. भा. द. वि. कलम ३८४ ५०० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील फिर्यादी यांना संपर्क करण्याकरिता वापरलेला मोबाईल क्रमांक याचे तांत्रिक विश्लेषण केले असता गुन्ह्यातील आरोपी हे भरतपूर, राजस्थान येथील असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीचा शोध घेणेकामी सायबर पोलीस स्टेशन कडील १ पथक भरतपूर, राजस्थान येथे पाठविण्यात आले त्यांनी भरतपूर, राजस्थान येथे जाऊन शोध घेतला असता पथकास आरोपी रिझवान अस्लाम खान वय २४ वर्षे, रा. ग्राम सिहावली महारायपूर, ता. नगर, जि. भरतपूर राजस्थान, हा मिळून आल्याने त्याचेकडे प्राथमिक तपासात केला असता त्याचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दि. ०९/०२/२०२३ रोजी अटक करण्यात आली. आरोपीकडून एकूण ०४ मोबाईल संचे व ०४ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

आरोपीकडून जप्त केलेल्या मोबाईल संचामध्ये स्क्रिन रेकॉर्ड केलेल्या एकूण ९० अश्लिल व्हिडीओ मिळून आल्या आहेत. अटक आरोपीस मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे करीत आहेत.

पुणे शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, मोबाईल नं. ७७४२६७०३५८, ८८६५०२४८६२, ८००१९७०१७८ ९५८७३४२८२८ या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करून अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची धमकी देऊन पैसे मागितले असल्यास किंवा मागत असल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे शहर या कार्यालयात किंवा ७०५८७१९३७५ / ७०५८७१९३७१ यावर संपर्क करावा.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे मा. पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर श्री. विजयकुमार पळसुले यांचे मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील, सहा. पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे, पोलीस उप निरीक्षक सचिन जाधव, राजकुमार जाबा, शिरीष गावडे, श्रीकृष्ण नागटिळक, संदिप यादव, प्रविणसिंग राजपुत, पुजा मांदळे यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!