क्राइम

वाकड पोलीसांनी केले मोटार सायकल चोरासह १,८५,०००/- रुपये किंमतीच्या ०४ मोटार जप्त..!!

वर्तमान टाइम्स वृत्तसेवा :- वाकड पोलिस स्टेशन चे सपोनि संतोष पाटील हे वरिष्ट अधिकारी यांच्या आदेशानुसार तपास पथकासह पेट्रोलींग करीत असताना पोशि. स्वप्निल लोखंडे यांना विश्वासु बातमीदारा कडून माहिती मिळाली की, एक व्यक्ति चोरीची मोटार सायकल विक्रीकरीता पाचपिर चौक, काळेवाडी पुणे येथे येणार आहे अशी बातमी मिळाल्याने, तात्काळ माहितीच्या ठिकाणी सापळा रचुन पोलिस थांबलेले असताना तेथे एक व्यक्ति मोटार सायकलवर येवुन थांबला त्याची हालचाल संशयीत वाटल्याने तो व्यक्ती म्हणजेच अनिकेत बाळु निकाळजे वय २६ वर्षे यांस शिताफीने ताब्यात घेतले, त्याचे ताब्यातील यामाहा एफझेड मोटार सायकल नं. एमएच. १४. एफझेड. ७७०३ बाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे त्याला पोलीस स्टेशन येथे आणुन विश्वासात घेवुन चौकशी केली असता यामा मोटार सायकल चोरी केली होती असे सांगीतले त्यामुळे वाकड पोलीस स्टेशनचे अभिलेख तपासले असता वाकड पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ९५ / २०२३ भादंविक ३७९ अन्वये दाखल असलेची माहीती मिळाली असल्याने गुन्हयात आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे झालेल्या तपासात त्याने दाखल गुन्हया व्यतिरीक्त आणखी दोन मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले त्याचेकडुन चोरी केलेल्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. तर आरोपीकडुन एकुण १,८५,०००/- रुपये किंमतीच्या ०४ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे सो, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो पोलीस उप आयुक्त, परि २, पिंपरी चिंचवड, मा. श्री. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे – १, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे २, सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, पोहवा. अतिश जाधव, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. विनायक घार्गे, पोशि कौतेंय खराडे, पोकॉ. अजय फल्ले, पोशि. तात्या शिंदे, पोशि भास्कर भारती यांनी मिळून केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!