ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२’ स्पर्धेचा निकाल जाहिर – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

वर्तमान टाईम्स वृत्तसेवा:- Chief Electoral Officer Maharashtra तर्फे घेण्यात आलेल्यालोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२’ स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पार्श्वभूमी: मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी लोकशाहीचा जागर स्पर्धा २०२२’ या माध्यमातून मतदार नोंदणी, निवडणूक प्रक्रिया व लोकशाही या विषयीची जनजागृती व्हावी, हा मुख्य उद्देश समोर ठेवून मतदार नोंदणी, मतदार ओळखपत्रासोबत आधार जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयी लोकगीते सादर व्हावेत व त्यातून समाजप्रबोधन व्हावे, असा मानस होता. या संदर्भात मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉ.गणेश चंदनशिवे यांनी नागरिकांना या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मताधिकाराबाबत प्रबोधन करण्याचे आवाहन केले होते.

जाहिर झालेला निकाल पुढील प्रमाणे आहे.

एकल गटांतर्गत स्नेहा मेश्राम (पुणे) यांना प्रथम,

प्रिया माकोडे (यवतमाळ) यांना द्वितीय,

बाळू बनसोडे (सोलापूर) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

समुहांतर्गतः ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित शाहीर नानाभाऊ परिहार आणि संच (जालना) यांना प्रथम शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील, खानदेश लोकरंग फाऊंडेशन, नगरदेवळा (जळगाव) यांना द्वितीय, शाहीर विनोद दिगंबर ढगे, दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था (जळगाव) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

एकल आणि समूह या दोन्ही गटांतर्गंत एकूण २० उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे

अ. एकल गट – उत्तेजनार्थ :

१. श्रीकांत देवगोंडा मेडशिंगे (कोल्हापूर),

२. बालाजी महादेव जाधव (रायगड),

३. विनोद विद्यागर (मुंबई उपनगर),

४. अनंता अर्जुन मिसाळ (बुलढाणा),

५. शंकर नागनाथ कांबळे (सोलापूर),

६. महादेव तुकाराम भालेराव (बीड),

७. शहाजान सरदार मुकेरी (नाशिक),

८. धनश्री दिनेश जोशी (जळगाव),

९. जयश्री उदय पेंडसे (सांगली),

१०. शिल्पा निनाद नातू (ठाणे).

आ. समूह गट – उत्तेजनार्थ : १. शाहीर बजरंग शंकर आंबी (सांगली), २. कविता विद्यागर (मुंबई), ३. अविष्कार विकास एडके (उस्मानाबाद), ४. अनुराधा गोपीनाथ कुलकर्णी, स्वरनिनाद ग्रूप, कोयना वसाहत कराड (सातारा), ५. सुरेश शंकर पाटील, आझाद हिंद शाहिरी पार्टी दिंडनेर्ली (कोल्हापूर), ६. प्रकाश गणपती लोहार, लोककला, कला, क्रीडा, सांस्कृतिक बहुउद्देशिय मंडळ (कोल्हापूर), ७. उषा कमलाकर शेजुळे, शाहीर कमलाकर विठ्ठल शेजुळे आणि पार्टी, नवी मुंबई (ठाणे), ८. गणपत ना. तारवे, क्रांती कला मंच, हातखांबा (रत्नागिरी), ९. शाहीर सुधाकर आरवेल, लोक कला पार्टी (मुंबई), १०. शंकर महादेव दवले (कोल्हापूर).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!