ताज्या घडामोडीपुणे

मौजमजेसाठी वाहन चोरी करणा-या आरोपीकंडुन 7 दुचाकी गाडया व 1 रिक्षा जप्त..!!

भारती विदयापीठ पोलीसांकडून 07 दुचाकी, 01 रिक्षा एकुण किंमत ४,५०,०००/- रुपयेचा मुद्देमाल गुन्हया मध्ये हस्तगत..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार, अभिजीत जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे असे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत सातारा रोडवरील कदम प्लाझा समोरील रोडवर येथे राजेश प्रकाश परळकर, वय-३० वर्षे, हा त्याचे ताब्यात असलेल्या रिक्षा क्रमांक MH12NW9102 हि मिळुन आल्याने, त्याचेकडील रिक्षाबाबत तपास करता ती गाडी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरंनं. ८१८ / २०२२ भादंवि कलम ३७९ या गुन्हयामधील चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने रिक्षा जप्त करुन आरोपीस गुन्हयात अटक केली.

तर अटके दरम्यान आरोपीकडे तपास करता त्याने आणखीन ०७ दुचाकी गाड्या निवेदन पंचनाम्याने काढुन दिल्याने ती वाहने जप्त करण्यात आल्या आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाने खालील प्रमाणे एकुण ०७ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ८१८/२०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ०९ / २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

३. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ०६/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

४. सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ०१/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

५. हडपसर पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि २५/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

६. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ५६/२०१८ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

७. जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हा रजि १४१ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

वरील प्रमाणे आरोपीकडुन ०७ दुचाकी गाडया व एक तीन चाकी रिक्षा अशी एकुण ०८ वाहने त्यांची एकुण किंमत ४,५०,०००/- रुपयेचा मुद्देमाल गुन्हया मध्ये हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्रीमती सुषमा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, विक्रम सावंत व अशिष गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!