ताज्या घडामोडी

प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षण मेळा भारतातील १९७ जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जाणार..!!

25 राज्यांमधील 197 जिल्ह्यांमध्ये या मेळ्याचे आयोजन केले जाणार आहे.

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मेळ्यात सहभागी होण्यासाठी तसेच तरुणांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्थानिक व्यवसायांना आमंत्रित करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून, स्किल इंडिया मिशन अंतर्गत भारतातील तरुणांसाठी व्यवसायाच्या संधींना चालना देण्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) 12 डिसेंबर 2022 रोजी देशभरात 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 197 ठिकाणी प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षण मेळा (PMNAM) आयोजित करणार आहे.

जेणेकरून स्थानिक तरुणांना प्रशिक्षणाद्वारे त्यांचे करिअर घडवण्याची संधी मिळावी या उद्देशाने अनेक स्थानिक व्यवसायांना मेळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील अनेक कंपन्या सहभागी होणार आहेत. सहभागी कंपन्यांना एकाच व्यासपीठावर संभाव्य प्रशिक्षणार्थींना भेटण्याची आणि जागेवरच अर्जदारांची निवड करण्याची तसेच त्यांना आपल्या संस्थेमधे सामावून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इच्छुक प्रशिक्षणार्थी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर वर भेट देऊन मेळ्यासाठी नोंदणी करू शकतात आणि आपल्या परिसरातील मेळ्याचे जवळचे ठिकाण शोधू शकतात. या प्रशिक्षणार्थी मेळ्यात इयत्ता 5 ते इयत्ता 12 वी उत्तीर्ण झालेले, कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्रे असलेले उमेदवार किंवा आयटीआय डिप्लोमाधारक किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांनी त्यांच्या रिझ्युमच्या तीन प्रती, सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या तीन प्रती, फोटो आयडी (आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो संबंधित ठिकाणी सोबत आणणे आवश्यक आहे.

ज्या उमेदवारांनी या आधीच नावनोंदणी केली आहे त्यांना सर्व संबंधित कागदपत्रांसह कार्यक्रमस्थळी पोहोचण्याची विनंती करण्यात आली आहे. या मेळ्याद्वारे, उमेदवारांना राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद (NCVET) मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देखील मिळेल आणि प्रशिक्षण सत्रानंतर त्यांच्या रोजगारक्षमतेचा दर सुधारेल.

प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी मेळ्याबाबत आपले मत व्यक्त करताना, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी म्हणाले, “आज तरुणांसाठी प्रशिक्षणाच्या संधी बाबतीत भारताची तुलना इतर विकसित अर्थव्यवस्थांशी केली जात आहे. ही दरी भरून काढण्यासाठी प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कठोर परिश्रम करण्यात, आपल्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यात आणि आपल्या देशाचे भविष्य घडविण्यात मदत करणार्‍या संभाव्य तरुणांनी गेल्या महिन्याच्या शिकाऊ मेळ्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. कंपन्यांना अधिक प्रशिक्षणार्थी नियुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे, तसेच योग्य प्रतिभा शोधण्यात आणि प्रशिक्षण आणि व्यावहारिक अनुभवाद्वारे त्यांची क्षमता विकसित करण्यात नियोक्त्यांना मदत करणे हा या मेळ्याचा मुख्य उद्देश आहे. शैक्षणिक परिसंस्थेमध्ये प्रशिक्षणार्थीता अंतर्भूत करणे शिवाय प्रशिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचे विश्वसनीय मार्ग तयार करणे देखील महत्त्वाचे आहे. मंत्रालयाच्या सततच्या प्रयत्नांसह भारतातील शिकाऊ संधी 2022 च्या अखेरीस 10 लाखांपर्यंत आणि 2026 पर्यंत 60 लाखांपर्यंत वाढवण्याचे आमचे ध्येय आहे”.

देशात दर महिन्याला प्रशिक्षण मेळे आयोजित केले जातात, ज्यामध्ये निवडक व्यक्तींना नवीन कौशल्ये शिकण्यासाठी सरकारी निकषांनुसार मासिक भत्ता मिळतो. प्रशिक्षण हे कौशल्य विकासातील सर्वात महत्वपूर्ण घटक मानले जाते आणि स्किल इंडिया मिशन अंतर्गत प्रशिक्षणाला मोठी चालना मिळत आहे.

सरकार दर वर्षी 1 दशलक्ष तरुणांना प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तसेच आस्थापना आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षण मेळ्याचा (PMNAM) एक व्यासपीठ म्हणून वापर केला जात आहे, तसेच सहभागी कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध संधींबद्दल तरुणांना जागरूकता देखील प्रदान करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!