ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

पूर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावर प्रवासी तसेच रेल्वे मालमत्ता असुरक्षित..!!

विविध मागण्यांचे रेल्वे महाव्यवस्थापकांना देण्यात आले निवेदन..

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि रेल्वे स्थानकाच्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी आलेले रेल्वे महाव्यवस्थापक श्री.अरुणकुमार जैन यांना रेल्वे मालमत्तेच्या आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी करणारे निवेदन महाबोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य प्रदीप नन्नवरे दिले आहे.

मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाचे रेल्वे जंक्शन पूर्णा रेल्वे स्थानकाची हे आहे. येथे मोठ्या संख्येत प्रवासी रेल्वेने प्रवास करतात परंतू प्रवासी यांच्या सुरक्षाविषयक रेल्वे प्रशासन गंभीर नसल्याचे रेल्वे महाव्यवस्थापक श्री.अरुणकुमार जैन यांनी निदर्शनास आणून दिले.

महा बोधी न्युज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य प्रदीप नन्नवरे यांनी दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे रेल्वे महाव्यवस्थापक श्री.अरुणकुमार जैन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण मराठवाडा विभागातील महत्त्वाचे स्थानका पैकी एक पुर्णा रेल्वे स्थानका हे मानले जाते. पूर्णा जंक्शन स्थानकावरील रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह वारंवार दिसून येत आहे. पूर्णा रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाणे आहे, मात्र पोलीस कर्मचारी संख्या केवळ दोन/तीन असल्याने प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे मालमत्तेची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे आपणं प्रवाशांच्या तसेच रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. 

निवेदनात महत्वपूर्ण मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.

1) लोहमार्ग पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून एक सहायक पोलीस अधिकारी व 10 ते 12 पोलीस कर्मचारी नेमावेत.

(२) रेल्वे संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून, रेल्वेची मालमत्ता, सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.

३) वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारांची वाढती संख्या पाहता लोकोशेड आणि रेल्वे स्थानक क्रमांक चारच्या आसपासचा तडीपार परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावा आणि या परिसराभोवती सुरक्षा भिंत बांधण्यात यावी.

४) पूर्णा रेल्वे स्थानक क्रमांक एकवरील रेल्वे तिकीट खिडकी तात्काळ उघडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना जारी करावे.

५) संपूर्ण रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना जादा दराने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. 

6) पुर्णा रेल परिसर मध्ये रस्त्यांचे बांधकाम सुरु आहे, हे बांधकाम बोगस व निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे, यामध्ये नुकत्याच बांधण्यात करण्यात आलेल्या रेल्वे कम्युनिटी हॉल ते विजय नगर डिप पर्यंतच्या हॉटमिक्स रस्त्याच्या कामाची त्वरित चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व तो पर्यंत रस्त्याचे काम व ठेकेदाराचे बिल थांबविण्यात यावे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!