ताज्या घडामोडीपुणे

घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराच्या स्कुटीच्या व्हिलचे रंगाच्या आधारे आवळल्या मुसक्या

महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी. २९,०३,४००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

पुणे दि. ४ निर्भीड वर्तमान:-खेड तालुक्यातील इंडीयन ऑइल पेट्रोल पंपाशेजारी, मोई निघोजे रोड लगत व्यापारी व क्रेशरप्लॅन्टचे मालक कर्पे यांचे घर आहे या घरामध्ये दि. २५/१२/२०२३ रोजी कोणीतरी अज्ञात चोरटयाने पाठीमागील बाजुने जिन्या जवळील खिडकीचे लोखंडी ग्रिलचे बार कापुन त्यावाटे आत प्रवेश करुन आतील सहा बेडरुम मधील वेगवेगळी लाकडी कपाटे उचकटुन त्यातील सोन्याचे दागिणे एकुण ४७.८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५,१५,०००/- लाख रुपये असा एकुण (तीस लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपये) ३०,४८,४००/- रुपये किंमतीचा मुददेमाल घरफोडी करुन चोरुन नेला होता. या विरुद्ध कर्पे यांनी तक्रार दिल्याने महाळुंगे एमआयडीसी पोलीसांकडून अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हा हा घर फोडी सारखा गंभीर स्वरुपाचा असल्याने तात्काळ याबाबत मा. पोलीस आयुक्त सेा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलाय यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना सीसीटीव्ही, तांत्रिक गोष्टी व गुप्त बातमीदारा मार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.

दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्हयाचे तपासाचे अनुशंगाने मौजे मोई, निघोजे, कुरुळी परीसरात पेट्रोलिंग करीत असताना चिंबळी फाटा ते कुरुळी गावाकडे जाणारे रोडवर डोंगरवस्ती येथे आमिर शब्बीर शेख, वय २५ वर्षे हा लाल रंग असलेल्या व्हिलच्या स्कुटीवर दिनांक ०२/०१/२०२४ रोजी संशयित रित्या फिरत असताना आढळुन आल्याने त्यास तपास पथकातील अंमलदार यांनी पकडण्याचा प्रयत्न करत असताना तो स्कुटी घेवुन पळुन जावु लागल्याने त्याला पोलिसांनी शिताफीने पाठलाग करुन पकडले व त्याची चौकशी केली असता त्याने हा घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

तर त्याच्या जवळून पोलिसानी ४७.८ तोळे वजनाचे सोने त्यात सोन्याचे गंठण, मिनी गंठण, राणीहार, चैन, अंगठया कानातील कर्णफुले जोड, बांगडया, ब्रेसलेट कडे व रोख रक्कम ३,००,०००/- लाख रुपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे मा.अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त श्री संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.राजेंद्रसिंग गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वसंतराव बाबर, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष कसबे, पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, पोहवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर पोना संतोष काळे, किशोर सांगळे, पोकों/ शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक प्रदिप गायकवाड, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!