SC व ST समुदायांचे आरक्षण वाढविण्याची केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची मागणी

मुंबई, निर्भीड वर्तमान:- (SC) शेड्युल कास्ट व (ST) शेड्युल ट्राईब समुदायांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची वाढ करण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मागणी केली आहे.

 

1950 आणि 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीचा हवाला देताना ते म्हणाले की, शेड्युल कास्ट ची लोकसंख्या 1950 मध्ये 15% असून, 2011 मध्ये ती 16.6% वर पोहोचली आहे. तसेच, शेड्युल ट्राईबची लोकसंख्या 7.5% वरून 8.4% वर गेली आहे. या दोन्ही समुदायांची एकत्रित लोकसंख्या 25% असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्याच अनुपातात आरक्षणाची मागणी केली आहे.

1950 ते 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित ही मागणी, सामाजिक न्यायाच्या मार्गावर एक महत्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.

Exit mobile version