Pune traffic police; वाहतूक पोलीसांची जागृतः हरवलेल्या 5 वर्षांच्या मुलीला वडीलांच्या सुखरुप दिले ताब्यात

पुणे, निर्भीड वर्तमान:- पुण्यातील घाईगडबडीच्या रस्तावर हरवलेली 5 वर्षांची मुलगी रडत रस्त्यांवरुन फिरत होती. हरवलेल्या मुलीला Pune traffic police वाहतूक पोलीसांच्या जागृतते मुळे वेळीच शोध घेऊन आपल्या वडीलांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आले आहे.

Pune traffic police

लोणीकंद वाहतुक विभागाचे पो.शि.गालफाडे व चौधरी हे आपले कार्यक्षेत्रात कर्तव्य बजावत असतांना केसनंद फाटा येथे त्यांना एक 5 वर्षाची लहान मुलगी पायी रडत जात असताना दिसली हि मुलगी एकटीच असल्याच्या संशयाने पोलीसांनी तिला ताब्यात घेतले, तिला विश्वासात घेऊन प्रेमाने शांत करून म.पो.शि. स्नेहल टकले यांनी तिची काळजीपूर्वक विचारपुस केली व तात्काळ संपुर्ण परीसरात फिरून तिच्या वडिलांचा शोध घेतला व त्यांचेकडे खात्री करून मुलीस तिच्या वडीलांच्या ताब्यात सुखरूप दिली आले.

लोणीकंद वाहतूक पोलीसांच्या कर्तव्यदक्षते सोबत जागृतः व तत्परतेने वेळीस लहान मुलगी आपल्या वडीलांना मिळाली व कोणत्याही प्रकारचा होणारा अनर्थ टळला आहे.

वाहतूक पोलीसांच्या कर्तव्यदक्षच्या या कौतुकास्पद कामगिरी बद्दल वाहतूक पोलिसांचे सर्वत्र कौतुका सोबत अभिनंदन होत आहे.

Exit mobile version