क्राइमताज्या घडामोडीपुणे

Pune Police; चोरीच्या गुन्हातील 2 महिन्यांपासुन फरार आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद

पुणे, निर्भीड वर्तमान:- बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जबरचोरी करून 2 महिन्यांपासुन फरार असलेला आरोपी याला जेरबंद करण्यात बंडगार्डन पोलीसांना यश आले आहे.

चोर
चोर

बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी पो. उप.निरी. रवींद्र गावडे व कर्मचारी बडे, सरक हे पेट्रोलिंग करत असताना पो. उप.निरी. रवींद्र गावडे व पो. शि. ज्ञाना बडे यांना आपल्या गोपनीय बातमीदाराकडुन बातमी माहिती मिळाली कि फरार आरोपी कोस्तूप देविदास कांबळे उर्फ गांधी रा – ताडीवाला हा ताडीवाला पाचबिल्डिंग या ठिकाणी येणार आहे तात्काळ बातमी आपल्या वरिष्ठांना कळवुन माहितीच्या ठिकाणी पोलीसांनी सापळा रचून फरार आरोपी कोस्तूप देविदास कांबळे उर्फ गांधी याला ताब्यात घेतले आहे.तर पुढील तपास स. पो. नि. कदम करत आहेत.

सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील मॅडम, साहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो. हवा सुधीर घोटकुले, पो.शि ज्ञाना बडे,शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!