Pune Police : घरफोडी चोरी करणा-या सराईतास केले जेरबंद, तीन गुन्हे आले उघडकीस

पुणे, निर्भीड वर्तमान:- सराईत चोरास जेरबंद करून तीन गुन्हे उघडकीस आणण्यास Pune Police सहकारनगर पोलीसांना यश आले आहे. दि.२१/०४/२०२४ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१२५/२०२४ भादवी कलम ४५७,३८० प्रमाणे चोरीचा गुन्हा नोंद झाला होता.

दाखल गुन्हयाचा तपास श्री. सुरेंद्र माळाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व श्री. उत्तम भजनावळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे व तपास पथकाचा स्टाफ तपास करीत असताना आपल्या खास बातमीदारमार्फत माहिती काढून आरोपी रोशन शांताराम बंडागळे, वय ३९ वर्षे यास ताब्यात घेण्यात आले होते.

त्याचेकडे तपास करतांना दाखल गुन्हा केल्याची आरोपी रोशन शांताराम बंडागळे याने कबुली दिली. त्याची झडती घेता त्याचे ताब्यात दाखल गुन्हयात चोरीस गेलेले ४०,०००/-रु. कि.चे सोन्याचे दागिने व चाव्यांचा जुडगा मिळुन आला आरोपीकडे अधिकचा तपास करता त्याने आणखी दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी बंडागळे हा मुळचा ठाणे येथील रहिवाशी असुन तो पुण्यात येवुन घरफोड्या करीत होता त्याचेवर यापुर्वी ठाणे व पुणे येथील भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्रीमती नंदीनी वग्यानी, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विशाल पवार तसेच सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, सहा. पोलीस उप निरीक्षक बापु खुटवड पोलीस अंमलदार बजरंग पवार, किरण कांबळे, अमोल पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, अमीत पदमाळे, प्रदिप रेणुसे, प्रशांत मुसळे यांनी केली आहे.

Exit mobile version