Puna Hospital : शस्रक्रियासाठी दाखल झालेल्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

पुणे, निर्भीड वर्तमान:- अपघातात पायाला मार लागला म्हणून शस्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या पुना हॉस्पिटल मध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा शस्रक्रियासाठी भुल दिल्यानंतर मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पुण्यातील प्रसिद्ध पुना हॉस्पिटल यांच्या विरोधात मृत मुलाच्या कुटुंबाने तक्रार दाखल केली आहे.

पायाची शस्थक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या पुना हॉस्पिटल मध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा शस्रक्रिया करताना मृत्यू 14 जुन रोजी झाला. हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी कामात हलगर्जीपना केल्याचा नातेवाईक यांनी आरोप केलेला असल्याने विश्रामबाग वाडा पोलीस ठाण्यात नातेवाईक यांनी पुना हॉस्पिटल विरोधात तक्रार दाखल केली आहे.

दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा मुलगा स्वराज हा 11 तारखेला क्लास वरून रिक्षाने घरी जात होता, खडकवासला येथे रिक्षाला दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने त्याच्या उजव्या मांडीला दुखापात झाल्याने त्याला पूना हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले, त्यानंतर डॉक्टर यांनी उपचारासाठी 90 हजार रुपये खर्च सांगितला होता दरम्यान मुलाच्या नातेवाईकांनी सुरुवातीला 30 हजार रुपये भरून उर्वरित पैसे शस्रक्रिया झाल्यानंतर भरण्याची विनंती केली होती.

त्यानुसार पूना हॉस्पिटल प्रशासनाने 14 जुन रोजी मुलाची शस्रक्रिया करण्यासाठी त्याला ऑपरेशन थेटर मध्ये घेतले, परंतु स्वराजला भुलीचे इंजेक्शनची रिऍक्शन झाल्याने त्याचे हृदयाचे ठोके वाढलेले असून, असे क्वचितच पेन्शन्टला त्रास होतो असे डॉक्टर कडून सांगण्यात आले, तर आम्ही जी चिट्टी लिहून देतो ती औषध तुम्ही घेऊन या, आणी ही औषध दिल्ली आणी मुंबईला मिळतात, त्यामुळे तुम्ही ती लवकरात लवकर घेऊन यावी, असे सांगण्यात आले त्यामुळे तात्काळ नातेवाईक ती चिट्टी घेऊन मुंबईला औषध आण्यासाठी गेलेले असतांना, रुग्णालयाने स्वराजचे डायलेसिस करावे लागेल असे सांगितले आणी त्यासाठी पुन्हा 80 हजार रुपये भरावे लागतील अन्यथा आम्ही पैसे भरल्याशिवाय डायलेसिस करणार नाही असे सांगण्यात आले, तर नातेवाईक पुन्हा पैसे जुळवाजुळव करण्यासाठी गेले असता संध्याकाळी 6 च्या सुमारास डॉक्टर पत्की यांचा नातेवाईकांना फोन आला की तुम्ही औषध आणू नका कारण स्वराज चा मृत्यू झालेला आहे याप्रकरणी नातेवाईक यांनी हॉस्पिटल मधील डॉक्टर आणी हॉस्पिटल प्रशासन यांच्यावर कारवाई करण्यात यावी अश्या स्वरुपाचे स्वराजचे वडील सुबोध पारगे यांनी लेखी तक्रारीत सांगितले आहे.

Exit mobile version