PMC : बेकायदेशीर बांधकाम ताबडतोब थांबवून मनपा सिटी इंजिनिअर प्रशांत वाघमारे यांचे निलंबन करा – राजेंद्र भोसले

पुणे, निर्भीड वर्तमान:- पुणे शहर हद्दीत बिबवेवाडी पुणे येथे स.नं. ५७८/२ मिळकतीवरून बांधकाम व्यावसायिक गंगा गोयल तर्फे जयप्रकाश सिताराम गोयल व त्याची दोन मुले अमित जयप्रकाश गोयल, अतुल जयप्रकाश गोयल आणि सदाशिव सोपाना शिंदे यांचेशी वाद चालू आहेत.

त्याबाबत एकमेकांविरूध्द मे. पुणे व मुंबई कोर्टात दावे कमांक ८२८/२०१३ पुणे, ८३७/२०१३ मुंबई, ५९०/२००९ पुणे, ५६०२/२०१४ मा. उपविभागीय अधिकारी प्रांत साहेब पुणे यांच्याकडे प्रकरण प्रलंबीत आहेत. या बाबत वेळोवेळी पुणे महानगरपालिकेमध्ये हरकत पत्र देण्यात आलेले असूनही बांधकाम विभागाने आणि पुणे महानगरपालिका शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सदर हरकतींना केराची टोपली दाखविलेली आहे.

कारणही तसेच आहे या विषयाबाबत स्पे.मु.नं. २०४/२०१० अन्वये दाखल करण्यात आलेला असून त्या कामी मे. दिवाणी न्यायालय व वरिष्ठस्तर पुणे यांनी दिनांक २८/०१/२०१० रोजीच हुकुम करून सदर मिळकतीबाबत “जैसे थे” परिस्थिती ठेवावी असा आदेश केलेला आहे. असे असतांनाही सदर बांधकाम अधिकारी व शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी कोर्टाचा अवमान करून वेळोवेळी बांधकामास परवानगी दिलेली आढळून आलेल आहे.

या ठिकाणी न्यायालयाचा अवमान झालेला दिसून येत असून संबंधित शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची न्यायालयीन व सीबीआय चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तातडीने निलंबीत करण्यात यावे. तसेच बिबवेवाडी स नं. ५७८/२ मधील बांधकाम ताबडतोब थांबविण्यात यावे या मागणीसाठी आज रक्षक फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र पांडुरंग भोसले यांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह पुणे महानगरपालिकेच्या आवारात सकाळी आंदोलन करण्यात आले आहे.

Exit mobile version