News Impact : बातमीचा इम्पॅक्ट अवैध ढाबा व चायनिज सेंटरवरती उत्पादन शुल्क विभागाचा छापा ; हॉटेल चालकासह, मद्यपीं विरूद्ध गुन्हे दाखल

निर्भीड वर्तमान बातमीचा इम्पॅक्ट उत्पादन शुल्क विभागाची कारवाई मा. न्यायालयाने ठोठावला २९५००/- रूपयेचा दंड.

पुणे, निर्भीड वर्तमान:- निर्भीड वर्तमान बातमीचा इम्पॅक्ट झाला असुन राज्य उत्पादन शुल्क विभागाची कात्रज येथील चायनीज, व्हेज-नॉनव्हेज नावाखाली सुरू असलेले अवैध मद्यविक्री व सेवन करणार्यावर गुन्हा दाखल केला असुन मा. न्यायालयाने हॉटेल चालकासह तीन मद्यपी ग्राहकांना २९५००/- रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सविस्तर:

सोमवारी (ता. २३ एप्रिल) दुपारी 2.30 वाजता निर्भीड वर्तमान बातमी प्रसारित केले होते की, कात्रज येथील आर.के वाईन्स शाॅप खालील हाॅटेल साईराज व शेजारील हाॅटेल मध्ये अवैध्य रित्या मद्य विक्री व मद्यसेवन केले जाते तर या संदर्भात रिपब्लिकन संघर्ष सेनेचे अध्यक्ष शशिकांत कांबळे हे पाठपुरावा करत होते व त्यांच्याकडून प्रसंगी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता त्यानुसार बातमीची तात्काळ दखल घेवून विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग श्री. सागर धोमकर व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे श्री. चरणसिंग रजपूत यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक ‘सी’ विभागाच्या पथकाने बातमी प्रसारित झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी पाच वाजता सुमारास कात्रज परिसरातील हॉटेल साईराज धाब्यांवर टाकलेल्या धाडीत मा. न्यायालयाने हॉटेल चालकासह तीन मद्यपी ग्राहकांना २९५००/- रुपयांचा दंड ठोठावला आहे.

निर्भीड वर्तमान प्रसारित बातमी वाचा

Illegal Drinking : चायनीज सेंटर, व्हेज नॉनव्हेज हाॅटेलमध्ये सर्रास मद्यसेवन, विक्री सुरू

सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क ‘सी’ विभागाच्या पथकाचे निरिक्षक संदिप कदम यांनी कात्रज शहराच्या हद्दीतील हॉटेल साईराज या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा मालक मोहम्मद जलील युसुफ अन्सारी हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आल्याने त्याचेसह तीन मद्यपी ग्राहक गणेश ढास, गणेश टेकाळे, दिगंबर मुजुमले यांना अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील तपास अधिका-यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, कोर्ट क्र. ४ शिवाजी नगर पुणे कु.अक्षी जैन यांनी हॉटेल मालकांस रु. पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संदिप कदम, दुय्यम निरीक्षक किरण पाटील, दुय्यम निरीक्षक प्रताप बोडेकर, सहायक दुय्यम निरिक्षक संदिप लोहोकरे, जवान शरद भोर, गोपाळ कानडे, उज्वला सुनिल भाबड महिला जवान व वाहनचालक सचिन इंदलकर यांच्या पथकाने पार पाडली.

रिपब्लिकन संघर्ष सेनेचे जाहिर आवाहन

आगामी लोकसभा निवडणुक २०२४ ची आचार संहिता लागू असून त्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून बेकायदेशीर तसेच बनावट मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली असून परराज्यातील दारुच्या अवैध वाहतूकीवर करडी नजर ठेवण्यात आलेली आहे. ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे कायद्याने गुन्हा आहे. यापुढेही कायद्याचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध रिपब्लिकन सेनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात येणार असून जो पर्यंत ठोस उपाययोजना करून कायम स्वरूपात हे अवैध उद्योग बंद होणार नाहीत तो पर्यंत पाठपुरावा व वेळ पडल्यास जनहितासाठी आंदोलन करण्याचा ईशारा रिपब्लिकन संघर्ष सेनेचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिला आहे.

Exit mobile version