MPSC: बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून चक्क महाराष्ट्र लोकसेवा आयोगा‌द्वारे थेट अधिकारी

प्रतिनिधी, अतुल गायकवाड :- राजपत्रित नागरी सेवा (एम.पी.एस.सी.) 2022 चा निकाल दिनांक 20 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर झालेला आहे. सदरच्या निकालामध्ये प्राप्त यादीमधील दिव्यांग प्रवर्गासाठी आरक्षित जागा आहेत. सदर दिव्यांग पदावर बोगस प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त करून घेतलेले उमेदवार यांचा समावेश आहे.

काही उमेदवारांनी आपला मूळ रहिवासी जिल्हा बदल करून अन्य जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले आहे. नुकतेच काही महिन्यापूर्वी काही शिक्षकांनी बोगस दिव्यांग पत्र शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त करून घेवून आपली बदली थांबविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलेली आहे. परंतु आता तर यापलीकडे काही उमेदवारांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखला शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त करून घेवून दिव्यांग आरक्षणामधून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा (एम.पी.एस.सी.) 2022 मध्ये थेट MPSC मधून उपजिल्हाधिकारी, सहाय्यक आयकर आयुक्त, शिक्षण अधिकारी इत्यादी पदे प्राप्त केलेली आहेत. याबाबत बऱ्याच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा (एम.पी.एस.सी.) परीक्षा देणाऱ्या उमेदवार यांच्या याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत.

सध्या दिव्यांग खाते मा.नामदार साहेब बच्चू कडू यांचेकडे आहे. त्यांनी यापूर्वी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र करणाऱ्यावर सात दिवसांचे आत कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यांचेकडे देखील काही उमेदवार याबाबत तक्रारी दाखल करणार आहेत. तसेच एम.पी.एस.सी. कडे दिव्यांग उमेदवारांचे एम.पी.एस.सी. मार्फत तज्ञ डॉक्टर यांची नियुक्ती करून दिव्यांग प्रमाणाचे तपासणी करण्यात यावी. सदर तपासणी नंतरच दिव्यांग कर्मचारी यांना नियुक्ती देण्यात यावी व बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आढळल्यास  सदर दिव्यांग उमेदवार त्यांना प्रमाणपत्र दिलेले शासकीय रुग्णालयातील डॉक्टर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत मागणी करण्यात येणार आहे.

Exit mobile version